काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा अकोला जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अभय पाटील
यांनी आज सकाळी आपल्या फेसबुक अकाउंट वरून काँग्रेसच्या सर्व प्राथमिक पदांचा
राजीनामा दिल्याचे जाहीर केले या त्यांच्या राजनाम्यावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ
मिळाली त्यांच्या समर्थकांनी या फेसबुक अकाउंट वर त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती सुद्धा
करण्यात आली परंतु काही कौटुंबिक कारणावरून मी सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे डॉक्टर अभय
पाटील यांनी अजिंक्य भारत न्यू शी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की माझी काँग्रेस पक्षावर कुठलीही नाराजी नाही
कौटुंबिक जबाबदारी वाढल्यामुळे तसेच त्यांच्या वैद्यकीय सेवेमध्ये अनेक अडचणी येत
असल्यामुळे ते सध्या राजकीय संन्यास घेत असून सामाजिक कार्य मात्र ते सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांच्या या राजीनामामुळे मात्र संपूर्ण राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून त्यांचे खांदे समर्थक नाराज झाले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/pavement-seller-aani-manpat-undir-manjracha-khel/