Dowry Crime : संतापजनक! हुंड्यासाठी विवाहितेच्या अंगावर सोडला साप, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
कानपूर : आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या भारतात आजही हुंड्यासारख्या कुप्रथा थैमान घालताना दिसत आहेत. हुंड्याच्या मागणीसाठी विवाहित महिलांचा छळ होण्याच्या घटना समोर येत असतानाच कानपूरमधून एक धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. येथे पाच लाख रुपयांच्या हुंड्यासाठी विवाहितेच्या अंगावर सासरच्यांनी विषारी साप सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुंड्याची मागणी आणि छळ
Related News
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
हिना खानने इफ्तारसाठी बनवले पारंपरिक फिरणी, चाहत्यांना दिला स्वादिष्ट अनुभव
हिना खान ही अभिनेत्री फक्त अभिनय कौशल्यासाठीच नाही, तर तिच्या पाककौशल्यास...
Continue reading
लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी; जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होणार – आदिती तटकरे
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य ...
Continue reading
मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा नावाच्या विवाहितेचे 19 मार्च 2021 रोजी शाहनवाज या तरुणाशी लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांनीच सासरच्या मंडळींनी तिला कमी हुंडा दिल्याचा आरोप करत त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्या वडिलांनी दीड लाख रुपये दिले होते, मात्र सासरच्यांनी आणखी पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने त्यांनी रेश्माला नरकयातना देण्याचा मार्ग अवलंबला.
साप सोडून मारण्याचा प्रयत्न
18 सप्टेंबर रोजी रेश्माला जबरदस्तीने जुन्या खोलीत बंद करण्यात आले. त्यानंतर त्या खोलीत एक विषारी साप सोडण्यात आला. या सापाने रेश्माच्या पायाला चावा घेतला. ती वेदनेने तडफडत असतानाही सासरच्यांनी तिला मदत करण्याऐवजी बाहेर उभे राहून हसत होते. शेवटी पीडितेच्या बहिणीने तिला वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर हॅलेट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सात जणांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी पीडितेच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी रेश्माचा पती शाहनवाज, सासू, सासरे, मेहुणे आणि मेहुणीसह सात जणांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींना कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे.
हुंडा प्रथा थांबवण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/ur-poisanchi-mothi-action/