चिखली : तालुक्यातील डोंगरशेवली येथे अस्वलांचा मुक्त संचार सुरू असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दशरथेश्वर महादेव मंदिर परिसरात सोमवारी (दि. 11 ऑगस्ट) दुपारी 3 वाजता अस्वल फिरताना दिसले.
डोंगरशेवली येथील राजेंद्र सावळे यांच्या शेतातील महादेव मंदिरात श्रावण महिन्यात पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात
. सध्या शेतीची कामेही जोमात सुरू आहेत. अशातच अस्वलांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांसमोर शेतीकाम करताना सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावकऱ्यांनी वन विभागाकडे तात्काळ अस्वलांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वीही परिसरात अस्वलांच्या हल्ल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
वन प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करावी, असा जोरदार आवाज नागरिकांकडून उठत आहे
Read also :https://ajinkyabharat.com/airport-authority-of-india-779-paharti-recruitment-pagar-rs-160-lakh/