डोणगाव: गावातील ग्रामसभेबाबत अनियमितता लक्षात येत असून, डोणगाव ग्रामपंचायतीत नुकतीच आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा प्रचार-प्रसिद्धीशिवाय झाली आहे. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामसभेचे अत्यंत महत्त्व असून, वर्षातून किमान चार ग्रामसभा आयोजित करणे अनिवार्य आहे. या सभांमध्ये गावाच्या विकास योजना, बजेट आणि अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाते.डोणगावची लोकसंख्या ३५ हजारांहून अधिक असून सुमारे १४ हजार मतदार आहेत. गावात सहा वार्ड असून अनेक समस्या आहेत. तथापि, ग्रामसभेची योग्य माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचत नसल्याने प्रत्यक्ष उपस्थिती फार कमी झाली. ग्रामसभा पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशा शासकीय कर्मचाऱ्यांना बोलावून केवळ १०० लोकांचा कोरम पूर्ण केला गेला, मात्र प्रत्यक्षात ३०-३५ ग्रामस्थ उपस्थित होते.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या ग्रामसभेबाबत गावकऱ्यांना केवळ व्हॉट्सॲपद्वारे माहिती देण्यात आली, दवंडी किंवा घंटागाडी वापरून प्रचार-प्रसिद्धी करण्यात आलेली नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्ती आणि प्रश्न निर्माण झाला आहे की, ही ग्रामसभा खरोखर लोकशाही पद्धतीने होत आहे का?गटविकास अधिकारी दिनकर खरात म्हणाले, “कोणतीही ग्रामसभा घेण्यापूर्वी गावात दवंडी व प्रचार-प्रसिद्धीद्वारे माहिती पोहोचवणे अनिवार्य आहे. अन्यथा ग्रामसभा वैध ठरत नाही.”गावकऱ्यांचे मत आहे की, ग्रामसभा खरोखर लोकशाही पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने दवंडी व इतर पारंपरिक मार्गांचा वापर करणे आवश्यक आहे.
read also : https://ajinkyabharat.com/avam-kuthan-aaplya-viyya/