डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार !

बटलरमध्ये

बटलरमध्ये निवडणूक रॅलीदरम्यान घडला प्रकार

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प

यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनियातील बटलरमध्ये निवडणूक रॅलीदरम्यान

Related News

गोळीबार करण्यात आला.

प्रचार रॅलीत डोनाल्ड ट्रम्प हे बोलत होते.

नेमके त्याचदरम्यान एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

यामध्ये ते जखमी झाले आहेत.

त्यानंतर देखील त्यांनी पुन्हा एकदा उभे राहून एक घोषणा दिली

आणि ते तिथून निघून गेले. यावेळी एकूण चार वेळा

गोळीबार झाल्याचा आवाज आल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

तसेच हल्लेखोर प्रचारसभेच्या बाजूलाच असलेल्या एका इमारतीत होता;

पण तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी प्रतिहल्ला करत हल्लेखोरांना कंठस्नान घातले.

या हल्ल्यात ट्रम्प थोडक्यात बचावले.

पण रॅलीत सहभागी झालेले अन्य दोन लोकही जखमी झाले असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

हल्लेखोरांनी एकामागून एक अनेक राऊंड फायर केले.

या हल्ल्यात ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेली.

घटनेचा मी तीव्र निषेध करतोः मोदी

ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर पंतप्रधान मोदींनीही चिंता व्यक्त केली आहे.

त्यांनी सोशल मीडियावर लिहिले.

‘माझा मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे.

या घटनेचा मी तीव्र निषेध करतो.

राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही.

त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.

आमचे विचार आणि प्रार्थना मृतांच्या कुटुंबीय, जखमी आणि अमेरिकन लोकांसोबत आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/vishalgad-encroachment-issue-airinewar/

Related News