H-1B आणि L-1 व्हिसावर नवीन शुल्क आणि कडक नियम, भारतासाठी मोठा धक्का, अमेरिकेने H-1B व्हिसासाठी 88 लाख रुपये शुल्क ठरवले; L-1 व्हिसासाठीही नवीन नियम, भारतीय आयटी कंपन्यांमध्ये खळबळ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B आणि L-1 व्हिसाबाबत धक्कादायक निर्णय घेतला आहे. H-1B व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांवर आता 88 लाख रुपये शुल्क आकारले जाणार असून, L-1 व्हिसासाठीही नवीन कडक नियम लागू केले जात आहेत. या निर्णयामुळे भारतीय आयटी कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे, कारण H-1B व्हिसा धारकांमध्ये भारताचा मोठा वाटा आहे. H-1B आणि L-1 व्हिसासाठी अमेरिकेतील नवीन नियमांनुसार अर्जदाराला नोकरीसंबंधित माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नवीन विधेयकामुळे व्हिसा पात्रता मर्यादित राहणार असून, नोकरीसाठी वेतन आणि नियुक्तीचे मानक वाढवले जाणार आहेत . H-1B व्हिसावर इतके मोठे शुल्क आकारल्यामुळे अनेक अमेरिकन कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना थेट अमेरिका पाठवण्यापासून मनाई केली आहे. त्यामुळे कंपन्या आता भारतातील ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्सचा अधिकाधिक फायदा घेत आहेत. या निर्णयामुळे भारतीय IT आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या परदेशातील ऑपरेशन्सवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकी प्रशासनाने सांगितले आहे की, सध्याची प्रणाली अनेकजण गैरवापर करत आहेत, त्यामुळे नवीन नियम आणि शुल्क लादण्यात आले आहे. H-1B आणि L-1 व्हिसा सुधारणा कायद्यामुळे आता भारतीय आयटी कर्मचाऱ्यांसाठी अमेरिका जाईल ते अधिकच कठीण होणार आहे. कंपन्यांनी आपल्या ऑपरेशन्सची रणनीती बदलणे आवश्यक ठरणार आहे, तर भारतीय IT सेक्टरवर या निर्णयाचा थेट परिणाम होईल.
read also:https://ajinkyabharat.com/pati-shantanu-moghechi-bhavnik-post-discussion/
