‘मी कमला हॅरिसपेक्षा सुंदर आहे’ -डोनाल्ड ट्रम्प

पेनसिल्व्हेनियाच्या

पेनसिल्व्हेनियाच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यावर

Related News

वैयक्तिक टिप्पणी केली. त्यांनी कमला हॅरिसच्या शारीरिक स्वरूपावर

आणि बुद्धिमत्तेवर टीका केली. त्यांच्या समर्थकांमध्ये ट्रम्प म्हणाले की,

मी त्यांच्यापेक्षा सुंदर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनियातील एका रॅलीत हे वक्तव्य केले.

अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत.

विद्यमान अध्यक्ष जो बिडेन अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर,

डेमोक्रॅट्सने उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना उमेदवारी दिली आहे. कमला हॅरिस यांची

डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी निकराची स्पर्धा आहे. याशी संबंधित एका प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की,

जो बिडेनपेक्षा कमला हॅरिसला पराभूत करणे सोपे आहे. ट्रम्प यांनी एका रॅलीत कमला हॅरिसची

खिल्ली उडवली आणि मी तिच्यापेक्षा सुंदर दिसत असल्याचे सांगितले.

Read also: https://ajinkyabharat.com/champai-soren-delhit-dahal-with-three-mlas/

Related News