डोंबिवलीत एका चार वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. रात्री झोपेत तिला सापाने दंश केला. तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण योग्य उपचार न मिळाल्यामुळे मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.माहितीनुसार, चार वर्षांची प्राणवी मामाच्या घरी आली होती. ती आपल्या मावशीच्या बाजूला झोपली होती. पहाटे सुमारे पाच वाजता तिला सापाने चावा घेतला .पण ती लहान असल्यामुळे आपली स्थिती स्पष्ट करू शकली नाही.थोड्या वेळाने मावशीवरही सापाने दंश मारल्यामुळे घरातील सदस्यांना खरा प्रकार समजला. नंतर प्राणवीला तातडीने केडीएमसी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला डॉक्टरांनी तिची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले, पण काही वेळात तिची तब्येत गंभीर झाली. नाजूक परिस्थिती लक्षात घेऊन मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला, पण रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे प्राणवी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अखेरचा श्वास घेतला . प्राणवीच्या मावशीवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबीयांनी रुग्णालयावर संताप व्यक्त केला आणि सर्पदंशविषयक औषध का उपलब्ध नाही असा सवाल उपस्थित केला आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी दीपा शुक्ला म्हणाल्या,
“संबंधित रुग्णालयाकडून संपूर्ण माहिती मागवली आहे. लवकरच या घटनेबाबत नेमकं काय घडले ते समोर येईल.”
कल्याण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साप आढळतात. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली असून, प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/asia-cup-zincarnantar-suryakumarcha-inspirational-decision/