डोहात बुडणाऱ्या मुलाला वाचवणाऱ्या अंकुश सत्कार
अकोला – बाळापूर तालुक्यातील व्याळा गावातील तरुण अंकुश सुरवाडे याने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे १२ वर्षीय मयूर झंझाळ हा जल आणण्यासाठी गेला असताना पाण्यात बुडू लागला.
ही घटना पाहताच क्षणाचाही विलंब न करता अंकुशने पाण्यात उडी घेत मयूरचा जीव वाचवला.
आपल्या जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या या शौर्याबद्दल वंचित बहुजन युवा आघाडी अकोला यांच्या वतीने अंकुशचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, सचिन शिराळे, सविताताई वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अंकुशच्या या कार्याचे गावासह संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाची लाट उसळली आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/freedom/