गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. जळगाव जिल्ह्यात तर गेल्या 20 वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद झाली असून, नद्यांना महापूर, रस्ते बंद आणि शेतकऱ्यांचं स्वप्न अक्षरशः मातीमोल झालं आहे. एका शेतकऱ्याने सांगितलं की, “पाच एकर कपाशी पिकावर पाच लाख रुपये खर्च केला, पण आता एक रुपयाचं उत्पन्नही मिळणार नाही. सरकारने दिवाळीपूर्वी मदत केली नाही तर दिवाळी अंधारात जाईल!” असा हतबल आक्रोश त्यांनी व्यक्त केला. चाळीसगाव तालुक्यात एका दिवसात १०० मिमी पावसाची नोंद, सातही मंडळांतील पिकांचे मोठे नुकसान. हादगाव शिवारात शेतातच कपाशी सडली, तर भडगाव, नाशिक भागातील पुरामुळे गिरणा नदी तुडुंब. एरंडोल तालुक्यात २० वर्षांनंतर एवढा मोठा पूर, उतरान गावात पाणी शिरलं. एरंडोल-येवला महामार्ग बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला. सिना, दुधना आणि चांदणी नद्यांना महापूर. सिना धरणातून १,०४,०१० क्यूसेक विसर्ग, परंडा-करमाळा आणि परंडा-बार्शी मार्ग बंद. अनेक गावं पाण्याखाली, स्थलांतर सुरू. मुक्ताईनगरमध्ये भाव कोसळले – केळीचा भाव ₹३,००० वरून ₹३०० प्रति क्विंटल, मजुरी ₹५००. शेतकऱ्यांचा खर्चही निघेना, विमा आणि पंचनाम्यांची मदत अद्याप मिळालेली नाही.“सरकारने तत्काळ पंचनामे करून मदतीची घोषणा करावी, अन्यथा दिवाळी आमच्यासाठी अंधारात जाईल!”
‘दिवाळी अंधारात जाईल!’

29
Sep