दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते चिंचोली गणू शाळेत अनोखे ध्वजारोहण
बाळापूर ता.प्र : तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा चिंचोली गणू येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी ध्वजारोहण सोहळा पार पडला.
या सोहळ्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात गावातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीने झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता, डिजिटल सुरक्षितता आणि विद्यार्थी सुरक्षितता
यासंदर्भात घोषवाक्ये देत व पोस्टर्स दाखवत जनजागृती केली.
यानंतर शाळा प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पूजनकार्य सरपंच वनमाला वाघ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद अंभोरे व पोलिस पाटील सुनील अंभोरे यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत आकोत यांनी दिव्यांग विद्यार्थी संकेत काकडे (इ. ४ थी) व कृष्णा बाबर (इ. ५ वी) यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.
या अनोख्या उपक्रमामुळे परिसरात शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून, मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, राजीव गांधी विद्यालयात ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक राजाभाऊ इंगळे यांच्या हस्ते पार पडले.
या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी सुरक्षा, सखी सावित्री, एक पेड माँ के नाम, सेल्फी विथ तिरंगा यांसारखे विविध उपक्रम राबवून शाळा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
सामूहिक कवायतींचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच विद्यार्थी-शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत आकोत, शिक्षिका संगीता भटकर, शिक्षक सुनील बाहे, विकास वाडकर,
जोशना गोतमारे, विलास सरदार, अन्नपूर्णा गोतमारे व तुळसाबाई सरदार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सुनील बाहे यांनी केले तर आभार प्रदर्शन विकास वाडकर यांनी मानले.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/risod-talukayat-tisananda-dhagafuti-paus/