केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना दिवाळीपूर्वी महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) वाढीची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. यावर्षीची पहिली महागाई वाढ जानेवारीपासून लागू झाली होती, तर 1 जुलै पासूनचा बदल अद्याप जाहीर नाही. अंदाजानुसार, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढून 58 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. याचा फायदा 50 लाखांहून अधिक केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. उदाहरणार्थ, एंट्री लेव्हल कर्मचाऱ्याचा पगार 18,000 रुपये असल्यास, सध्याचा DA 55% म्हणजे 9,900 रुपये होता; 3 टक्के वाढीनंतर तो 10,440 रुपये होईल. यामुळे दरमहा 540 रुपये वाढ होईल आणि वर्षाला 6,480 रुपयांचा थेट फायदा मिळेल. सरकार 7 व्या वेतन आयोगाच्या फॉर्म्युल्याप्रमाणे, सीपीआय-आयडब्ल्यूच्या आधारावर महागाई भत्त्याची गणना करते. कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ दिवाळीच्या सणाच्या आधी मोठा गिफ्ट ठरणार आहे.
read also:https://ajinkyabharat.com/tata-motorsvar-jhalela-fierce-cyber-u200bu200bhalla/
