बोरगाव मंजू: – मनूताई कन्या विद्यालय, अकोला येथे आयोजित तालुकास्तरीय अखिल
भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात परशुराम नाईक विद्यालय,
बोरगाव मंजू याने आपले स्थान पक्के केले.
या वर्षी “काँटम युगाची सुरुवात: संभाव्यता व आव्हाने”
या विषयावर 8 अ मधील विद्यार्थी कु. राधा निलेश पोफळे
यांनी वैज्ञानिक पद्धतीने मांडणी करून दुसरा क्रमांक मिळवला.
जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी शाळेची निवड झाल्याबद्दल
जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी अरविंद मोहोरे, विज्ञान पर्यवेक्षक प्रमोद टेकाळे,
प्राचार्या धारस्कर व डॉ. रविंद्र भास्कर यांनी विद्यार्थी व
मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार केला. शाळेचे प्राचार्य मनोज आगरकर,
उपमुख्याध्यापक जीटी पोहनकर, पर्यवेक्षक एस एच भदे यांचे प्रोत्साहन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष किरणराव नाईक, दीपकराव नाईक, डॉ. प्रथमेश नाईक
आदींच्या शुभेच्छा व अभिनंदनाने विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचा उत्साह वाढवला.
Read also : https://ajinkyabharat.com/gharasmorun-motarusal-chori-kai-tasant-accused/