अकोला, दि. 28 – जिल्ह्यात आजपासून दि. 30 ऑगस्टपर्यंत पाऊस पडण्याची
शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे.
पावसामुळे नदी, नाले व तळ्यांतील पाणीसाठ्यात वाढ झाली.
त्यामुळे पाण्यात शिरण्याचे अनावश्यक धाडस करू नये.
नदीमध्ये वाहून जाणे किंवा बुडण्याची शक्यता आहे.
पुर आलेल्या रस्त्यावरून गाडी चालविणे टाळावे.
पाणीसाठ्याजवळ सेल्फी काढण्याचा मोह करू नये.
वीज व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा.
अशास्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये.
नदीकाठाजवळील गावातील गावक-यांना सतर्कतेची सुचना देण्यात आली आहे,
असे आवाहन करण्यात आले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/bizarre-blood-half-maitrinichi-killing/