कारंजा : महाराष्ट्र शासन क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॉल-बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा नुकतीच तालुका क्रीडा संकुल, कारंजा येथे १२ व १३ सप्टेंबर रोजी संपन्न झाली.या स्पर्धेत १९ वर्षाखालील व १४ वर्षाखालील मुलांच्या गटात एच. डी. मॉडर्न मदरसा अँड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला. विद्यार्थ्यांच्या या गौरवपूर्ण यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष इमरान मोहम्मद पोपटे, सचिव इनाया इम्रान पोपटे, व मुख्याध्यापिका तलत अंजुम यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांच्या यशामध्ये क्रीडा शिक्षक शकील पप्पू वाले यांचे मार्गदर्शन व तोहीद यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे.एच. डी. मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा !
read also :https://ajinkyabharat.com/aquarius-naveen-business-personal-yanyachi-shakti-ai/