दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट; सतीश सालियन यांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं वक्तव्य

दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट; सतीश सालियन यांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं वक्तव्य

दिशा सालियनच्या वडिलांनी आज अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

त्यामुळे प्रकरणात मोठं ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Related News

त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या प्रकरणात त्यांनी शिवसेना

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांवर दबाव होता असा आरोप करण्यात येत आहे.

मात्र याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मागच्या पाच वर्षांमध्ये तुमच्यावरती दबाव होता का? आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर तुम्ही

सर्व सांगितलं होतं तर तुम्ही गप्प का असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला.

यावर प्रतिक्रिया देताना माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की नेमकं काय घडलं याची कल्पना मला नव्हती, मला हे सर्व नंतर काळलं.

मला आधीपासून या प्रकरणातील पुराव्यांबाबत माहिती नव्हती. हे सर्व पुरावे एक -दोन वर्षांमध्ये समोर आले आहेत.

मी एसआयटीला म्हटलं होतं की, तुम्हाला जी काही कारवाई करायची आहे ती करा.

माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता असं सतीश सालियन यांनी म्हटलं आहे.

त्यांनी पोलीस आयुक्तांकडे नेमकी काय मागणी केली याबाबत त्यांचे वकील निलेश ओझा  यांनी माहिती दिली आहे.

‘दिशाचे वडील सतीश सालियान यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

आदित्य ठाकरेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

परमबीर सिंग, सचिन वाझेलाही आरोपी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे’,

असं यावेळी निलेश ओझा यांनी म्हटलं आहे.

आरोप -प्रत्यारोपाला उधाण 

या प्रकरणात सतीश सालियन यांनी जी याचिका दाखल केली आहे, त्या याचिकेमध्ये

आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत.

त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला उधाण आलं आहे.

Related News