स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर की मिताली राज? टीम इंडियातील सर्वात श्रीमंत महिला खेळाडू कोण?
भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करून भारतीय महिलांनी विजय मिळवला आणि 47 वर्षांत पहिल्यांदाच वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव कोरलं. या सुवर्णक्षणानंतर देशभरात जल्लोष असून बीसीसीआयसह अनेक संस्थांकडून खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
या चमकदार यशामध्ये स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर आणि माजी कर्णधार मिताली राज यांचा सिंहाचा वाटा आहे. मैदानावरच्या खेळासोबतच या खेळाडूंची कमाई, ब्रँड व्हॅल्यू आणि नेटवर्थ याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. तर पाहूया तिघींपैकी सर्वाधिक श्रीमंत खेळाडू कोण?
मिताली राज: भारतीय महिला क्रिकेटची ‘लेजंड’, सर्वात श्रीमंत खेळाडू
मिताली राज हे नाव भारतीय महिला क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं आहे. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली मिताली पुढे जागतिक स्तरावर भारतीय संघाचं नेतृत्व करणार हे कुणालाच माहित नव्हतं. शांत, संयमी आणि धडाडीच्या फलंदाजीमुळे तिने अनेक विक्रम रचले.
Related News
- एकूण संपत्ती: ₹40-45 कोटी
- आयाचे प्रमुख स्रोत:
- क्रिकेट कारकीर्द
- ब्रँड एंडोर्समेंट्स
- मार्गदर्शन व क्रिकेट विकास कार्यक्रम
- उपस्थिती फी आणि स्पॉन्सरशिप
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू म्हणून तिचं नाव आजही सर्वोच्च आहे. निवृत्तीनंतरही तिच्या कमाईत घट झालेली नाही. मोठ्या ब्रँड्ससोबत भागीदारी, क्रिकेट कार्यक्रमांमध्ये उपस्थिती आणि तरुण खेळाडूंना मार्गदर्शन हे तिचे प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत आहेत.
मिताली राज निःसंशयपणे भारताची सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे.
स्मृती मंधाना: सौंदर्य, शैली आणि दमदार फलंदाजीची राणी
स्मृती मंधाना सध्या भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात तेजस्वी नावांपैकी एक आहे. उपकर्णधार म्हणून तिने संघाला स्थिरता, आत्मविश्वास आणि आक्रमकता दिली आहे. तिची खेळातील सातत्यपूर्ण कामगिरी, तंत्रशुद्ध फलंदाजी आणि मैदानावरील शांत स्वभाव यामुळे ती चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण करून आहे. वर्ल्डकप 2025 स्पर्धेत तिने अप्रतिम फलंदाजी करत जगभरातील क्रिकेटप्रेमींना आपलेसे केले. निर्णायक सामन्यांमध्ये तिने केलेल्या दमदार खेळीमुळे भारताच्या मोहिमेला गती मिळाली आणि संघाला सर्वोच्च पदाकडे नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या शॉट्समधील आकर्षकता, वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्याची क्षमता आणि सकारात्मक वृत्ती या गुणांमुळे ती आजच्या पिढीतील आदर्श ठरली आहे. स्मृतीच्या यशाने अनेक तरुणींना क्रिकेटकडे प्रोत्साहित केले आहे, आणि ती आगामी काळात भारतीय क्रिकेटसाठी आणखी मोठी कामगिरी करेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
- एकूण संपत्ती: ₹32-34 कोटी
- बीसीसीआय ग्रेड A पगार: ₹50 लाख / वर्ष
- WPL वेतन: ₹3.4 कोटी / हंगाम
- इतर उत्पन्न:
- ब्रँड एंडोर्समेंट्स
- सोशल मीडिया कॅम्पेन
- स्वतःचा SM-18 कॅफे व्यवसाय
सोशल मीडियावर मोठा फॅनबेस, उत्तम मॉडेलिंग आणि ब्रँडिंग अपील यामुळे स्मृतीची ब्रँड व्हॅल्यू झपाट्याने वाढत आहे. तिचा कॅफे व्यवसायही लोकप्रिय होत आहे. क्रिकेटसोबतच व्यावसायिक दृष्ट्या ती सतत पुढे जात आहे.
हरमनप्रीत कौर: दमदार कर्णधार आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला क्रिकेटचा दृढ आधारस्तंभ मानली जाते. तिच्या नेतृत्वगुणांनी, कठोर मानसिकता आणि धडाडीच्या खेळशैलीने भारतीय संघाला नेहमीच विजयाचा मार्ग दाखवला आहे. 2025 च्या वर्ल्डकपमध्ये भारताला जगज्जेते करण्यामध्ये तिचा सर्वात मोठा वाटा होता. कठीण प्रसंगी शांत राहून योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि संघभावनेवर दिलेला भर यामुळे ती सर्वांची लाडकी कॅप्टन ठरली. तिच्या नेतृत्वाखाली भारताने नवा इतिहास रचत विश्वविजेतेपद पटकावलं आणि संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण दिला. हरमनप्रीतची ही यशोगाथा प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी ठरते.
- एकूण संपत्ती: ₹25 कोटी
- बीसीसीआय ग्रेड A पगार: ₹50 लाख / वर्ष
- WPL वेतन (मुंबई इंडियन्स): ₹1.8 कोटी / हंगाम
- इतर उत्पन्न: ब्रँड करार आणि जाहिराती
वर्ल्डकपनंतर हरमनप्रीतची ब्रँड व्हॅल्यू आणखीनच वाढली आहे. अनेक प्रतिष्ठित ब्रँड्स तिच्यासोबत करार करत आहेत. कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ती भारतातील सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये गणली जाते.
तिघींपैकी सर्वात श्रीमंत कोण?
| खेळाडू | अंदाजे संपत्ती |
|---|---|
| मिताली राज | ₹40-45 कोटी |
| स्मृती मंधाना | ₹32-34 कोटी |
| हरमनप्रीत कौर | ₹25 कोटी |
मिताली राज आजही भारताची सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे. तिच्यानंतर स्मृती मंधाना आणि मग हरमनप्रीत कौर या स्थानावर आहेत.
भारतीय महिला क्रिकेटमध्ये बदलाची नांदी
प्रीमियर लीग (WPL) सुरू झाल्यानंतर महिला क्रिकेटपटूंचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. बीसीसीआयने करारांमध्ये वाढ, प्रोत्साहन रक्कम आणि जाहिराती यामुळे महिला खेळाडूंना अधिक आर्थिक स्थैर्य मिळत आहे.
आज खेळाडू केवळ क्रिकेट मैदानावरच नाही तर गुंतवणूक, व्यवसाय आणि ब्रँडिंगमध्येही पुढे येत आहेत. यामुळे महिला क्रिकेटचा उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग मोकळा होत आहे.
भारतीय क्रिकेटचा हा सुवर्णकाळ आहे आणि येत्या काळात आणखी खेळाडू करोडपतींच्या यादीत दिसतील हे निश्चित.
read also:https://ajinkyabharat.com/rohit-aryacha-who-kept-17-children-in-olis/
