विवरा : तालुक्यात यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी
व ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नदी-नाले मर्यादा ओलांडून वाहू लागल्याने शेकडो शेतकऱ्यांची शेतपिके पुराच्या पाण्यात वाहून गेली.
अनेक शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने पिके सडण्याची वेळ आली.
मात्र, कृषी व महसूल विभागाकडून केवळ नदीकाठच्या नुकसानग्रस्त पिकांचेच सर्वेक्षण करण्यात येत
असून नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या संदर्भात तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पातूरचे तहसीलदार डॉ. राहुल वानखडे
यांना निवेदन सादर केले. या निवेदनात, नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांच्या
शेतपिकांचे तात्काळ सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात यावेत
आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात यावा,
अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सन २०२४-२५ मध्ये खरीप हंगामासोबतच
रब्बी हंगामातील कांदा सीड प्लॉट, गहू, मूग, तीळ, भुईमूग आदी पिकांचेही
अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. तरीदेखील महसूल व
कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांना सर्वेक्षण व शासकीय मदतीपासून वंचित ठेवले. अ
शा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शेतकरी रक्षण देशमुख, मंगेश केनेकर,
निलेश देशमुख आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून पंचनाम्याच्या वेळी मुजोरी केली
जात असल्याची तक्रारही केली. शेतकऱ्यांसोबत सौजन्याने वागावे,
अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
तहसीलदार डॉ. वानखडे यांनी निवेदन स्वीकारून सांगितले की,
“ज्या शेतकऱ्यांच्या शेतात नाल्याचे पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले आहे,
त्यांच्या शेतपिकांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात येतील.”
read also : https://ajinkyabharat.com/umbarda-bazar-kanya-shalela-gati-gati-gati-bhaijun-vidyarthaninch-mothe-loss/