मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण

मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण

विशाल आग्रे । अकोट प्रतिनिधी

अकोट – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व अद्ययावत ठेवण्याच्या उद्देशाने अकोट

तहसील कार्यालयात बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) व पर्यवेक्षक यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

Related News

उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले.

यावेळी अकोट तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण, तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे,

तसेच निवडणूक नायब तहसीलदार सुभाष सावंग व संजय ढगे प्रमुख उपस्थित होते.

अकोट व तेल्हारा तालुक्यातील एकूण ३४६ बीएलओ व पर्यवेक्षक यांना निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार जबाबदाऱ्या समजावून देण्यात आल्या.

संजय बेलुरकर यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून कृतीशील प्रशिक्षण दिले,

तर महेंद्र राऊत यांनी बीएलओ अ‍ॅपवरील तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या.

उपविभागीय अधिकारी लोणारकर यांनी यावेळी मतदार याद्यांचे अचूकतेने संकलन करून

निपक्षपणे व पारदर्शक कार्य करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंद्धात वानखडे व नंदकुमार पचांग यांचे विशेष सहकार्य लाभले.

Read Also : https://ajinkyabharat.com/hivarkhed-complex-plantation-journalist-sangatkardon-environment-pujan/

Related News