मतदारसंघात रस्ते खराब, आमदाराची लेक बापाविरोधात मैदानात; महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं

मतदारसंघात रस्ते खराब, आमदाराची लेक बापाविरोधात मैदानात; महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं

मोठी बातमी समोर येत आहे, अहेरी तालुक्यातील अनेक रस्ते अर्धवट असल्यामुळे

राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला असून, भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

राजकारणात काहीही होऊ शकतं, आपण अनेकदा काकांविरोधात -पुतण्या, भाऊ विरोधात भाऊ,

Related News

भाऊ विरोधात बहीण अशा लढती झालेल्या पाहिल्या आहेत. मात्र गेल्या विधानसभेत महाराष्ट्रात अशीही

एक लढत होती, जिने संपूर्ण राज्याचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. इथे वडिलांविरोधात थेट लेकच मैदानात होती.

मात्र या लढतीमध्ये शेवटी वडिलांचाच विजय झाला.  ही निवडणूक आजही मतदारांमध्ये चर्चेचा विषय आहे.

गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात वडील विरूद्ध लेक अशी लढत पाहायला मिळाली.

या मतदारंसघातून अजित पवार गटानं  धर्मरावबाबा आत्राम यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटला मिळाला.

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या मतदारसंघात भाग्यश्री आत्राम हलगेकर यांना तिकीट देण्यात आलं.

भाग्यश्री आत्राम या धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात वडील आणि

मुलगी यांच्यामधील लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम यांचा विजय झाला.

दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा भाग्यश्री आत्राम हलगेकर या आपले वडील धर्मरावबाबा आत्राम

यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत

. वडिलांचा मतदारसंघ असलेल्या अहेरी लातुक्यातील अनेक रस्ते अर्धवट आहेत, त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी

राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. भाग्यश्री आञाम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. बेशरमाची झाडे

रस्त्यावर लावून आंदोलन करण्यात आलं, या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसह

ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते. वडील आमदार असताना लेकीचे त्याच मतदारसंघात चांगल्या

रस्त्यांसाठी आंदोलन सुरू आहे, त्यामुळे या आंदोलनाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना भाग्यश्री आत्राम यांनी दिली आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/kasanchaya-vadisathi-tayar-kara-hey-3-homemade-hair-spray/

Related News