अश्विन कुमार दिग्दर्शित सुपरहिट ॲनिमेटेड चित्रपट ‘महावतार नरसिम्हा’ आता ओटीटीवर स्ट्रीमिंगसाठी सज्ज झाला आहे. थिएटरमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळवलेल्या या चित्रपटाने ‘सैयारा’सुद्धा मागे टाकलं होतं.
२५ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात भक्त प्रल्हादाची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यात भगवान विष्णूने नरसिंह अवतार घेऊन दानवराज हिरण्यकश्यपूचा वध केला होता. ५६ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर प्रेक्षक आता घरबसल्या किंवा मोबाईलवरही हा चित्रपट पाहू शकतील.
नेटफ्लिक्सने अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर केले की, १९ सप्टेंबर दुपारी १२.३० वाजल्यापासून हा चित्रपट संपूर्ण देशभरात स्ट्रीम होईल.
कमाई आणि प्रतिक्रिया:
‘महावतार नरसिम्हा’ने जगभरात ३२५.६५ कोटी आणि भारतात २५०.२ कोटी रुपयांची कमाई केली. दिग्दर्शक अश्विन कुमार म्हणाले, “पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा टप्पा पार झाल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. प्रेक्षकांना ग्रँड ॲनिमेशनचा अनुभव देणे ही आमची मोठी कामगिरी आहे. भारतात ॲनिमेशन चित्रपट फक्त लहान मुलांसाठी असतो असा समज होता, परंतु आमच्या चित्रपटाने हाच दृष्टिकोन बदलला आहे.”
हा चित्रपट २४ तासांतच नवीन रेकॉर्ड निर्माण करण्याची अपेक्षा आहे.
read also :https://ajinkyabharat.com/bigg-boss-19-madhane-amal-malikcha-dhakkadayak-reveal/