धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा मोठा बचाव आणि आर्थिक संकट निर्माण झाले आहे. घरांची पडझड, पिकांचे नुकसान आणि जनावरांच्या चाऱ्याची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटातही काही बँकांकडून कर्ज वसुली सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला होता. संचितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना SBI बँकेने नोटीसा पाठवलेल्या होत्या. यावर एबीपी माझाच्या रिपोर्टनंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सर्व बँकांना स्पष्ट निर्देश देत कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील होल्ड तातडीने हटवून शासनाकडून मिळणारे अनुदान आणि मदत रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच नवीन नोटीसा देऊ नयेत, असा स्पष्ट निर्देश सर्व बँकांना देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता शेतकरी कर्ज वसुलीची भीती न बाळगता आपल्या कुटुंब आणि शेती पुन्हा उभे करण्यासाठी काम करू शकतील, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
read also:https://ajinkyabharat.com/patini-automatically-absconding/