धरण फुटण्याच्या भीतीने ग्रामस्थांनी जागून काढल्या 2 रात्री*

धरण फुटण्याच्या भीतीने ग्रामस्थांनी जागून काढल्या 2 रात्री

लोणार :—–(प्रतिनिधी)
आमदार खरात आणि माजी आ.रायमुलकर  यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी  आणि दिले सिंचन प्रकल्प अधिकाऱ्यांना नागरीकांच्या

सुरक्षिततेचे निर्देश, व  नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
आ. सिद्धार्थ खरात यांनी काल नुकसानग्रस्त भागाची तसेच सिंचन प्रकल्पास पडलेल्या भगदाडी ची पाहणी   केली

देऊळगाव कुंडपाळ

परिसरात सोमवारी रात्री झालेल्या ढग फुटी सदृश्य मुसळधार पावसाने पिकाचे आणि इतर शेतीपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज

मंगळवार रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांनी कार्यकर्त्यांसमवेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला तसेच सिंचन प्रकल्पाच्या बाबत

वस्तूस्थिती जाणून घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत  निर्देश दिले व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सांगितले.

त्यांच्या समवेत ऊबाठाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुधवत, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी, माजी सरपंच भागवतराव नरवाडे, रामभाऊ जायभाये, उबाठाचे सतीश नरवाडे,

विजय सरकटे, किशोर नरवाडे,विष्णू जायभाये,नितिन सरकटे, सुभाष गाढवे केशव सरकटे आणि उबाढा चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते तर आज तारीख 23 रोजी

आमदार संजय रामुलकर यांनी कार्यकर्त्यासमवेत नुकसानग्रस्त भागाचीपाहणी केली, शिवसेना तालुका अध्यक्ष भगवान सुलताने , जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी,

संदिप सरकटे ,संतोष सरकटे,सुनिल नरवाडे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते सोबत होते.

दरम्यान  ता 22 व 23 रोजी रात्री प्रशासनाकडून ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता, महसूल प्रशासन ,पोलीस प्रशासन ,ग्रामपंचायत प्रशासन,

आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी, परिवहन सेवेचे अधिकारी,अग्निशमन सेवेचे कर्मचारी तैनात होते.

तहसीलदार लोणार यांनी ग्रामस्थांना परिस्थिती समजावून सांगितली.
गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी जाण्याबाबत सूचित करण्यात आले त्यासाठी नागरिकानी आपल्या

इच्छित सुरक्षा स्थळी जाऊन  रात्र काढली  तसेच परिवहन विभागाचे बसेस सुद्धा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी  नेण्यासाठी  होत्या, नागरिकांना लोणार , माऊली मंदिरा मध्ये,

साखरखेडी देवी संस्था मध्ये आणि माऊली मंदिर परिसरात तसेच आपआपल्या नातेवाईकांकडे, व्यायाम शाळेवर गावकरी रात्री मुक्कामी होते.

रात्रभर गावात शुकशुकाट पहायला मिळाला,
ग्रामस्थ आपले घर सोडून इच्छित संरक्षित स्थळी दाखल झाले परंतु रस्त्यावर  परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून कार्यकर्ते होते.

*बोगदा दाबण्याऐवजी सांडव्यातून पाणी काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न*

धरण भिंतीच्या मधोमध ज्या ठिकाणी भिंतीला भगदाड पडले ते भगदाड दाबायचे सोडून प्रशासनाकडून धरणातील पाणी सांडव्यातुन बाहेर काढण्यासाठी मोठी

नाली खोदण्याचे काम पोकलँड व जेसिबीने हाती घेतले. आज सकाळपर्यंत सदर भगदाड दाबण्यात आले नसल्याचा आरोप प्रत्यक्ष ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर केला.

प्रशासनाकडून जखम हाताला मलम पट्टी कपाळाला अशी उपाय योजना केल्याचा प्रत्यय आल्यामुळे प्रशासनाबद्दल ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

धरण फोडा   नाहीतर बोगदा बुजवा,ग्रामस्थांची प्रशासनाकडे आर्त हाक!

गावातील विशाल नरवाडे या युवकाने धरणाच्या भिंतीला भगदाड पडले व  त्यातून पाणी येत असल्याचे सांगितले  होते.

सदर बाब प्रशासनाला माहिती झाल्यानंतर बोगदा दाबण्याची कारवाई सुरू झाली गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला त्याच दरम्यान पाटबंधारे विभागाकडून बोगदा

बुजवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आली रात्री उशिरा दाबण्या साठी पोकलँड जेसीबी दाखल झाले महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांनीसुद्धा प्रकाश व्यवस्था करून ठेवली.

परंतु बोगदा दाबणे ऐवजी सांडव्यातून पाणी काढण्यासाठी  वेळ घालवण्यात आला, सकाळपर्यंत बोगदा दाबण्यात  आला नव्हता प्रशासनाकडुन नैवेद्य दाखवण्याचे काम करण्यात आले ,

बोगदा दाबला  नसल्याचा आरोप शुभंम ऊर्फ बंडु सरकटे,विजय सरकटे,योगेश सरकटे यांच्यासह ग्रामस्यानी केला आहे.