धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण

धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण

अकोट | प्रतिनिधी

अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून,

Related News

प्रयोगशाळेच्या अहवालानुसार ते कॉलराने बाधित होते, हे स्पष्ट झाले आहे.

या घटनेनंतर आरोग्य विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या असल्या तरी, एक नागरिक गमावल्यानंतरच यंत्रणा जागी झाली,

अशी तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीमुळेच हा बळी गेला.

गावात प्रतिबंधात्मक उपाय सुरू

घटनेनंतर धामणा गावात कॉलराचा अधिकृत उद्रेक जाहीर करण्यात आला असून,

आरोग्य विभागाच्या ४ पथकांद्वारे घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे.

गावात सध्या ८० घरे असून, सर्व घरांची तपासणी करण्यात आली आहे.

पिण्याच्या पाण्यावर भर

गावकऱ्यांना पाणी उकळून पिण्याचे, आर.ओ. पाणी किंवा मेडिक्लोर वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

करोडी उपकेंद्रामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.

गावात आरोग्य शिक्षणाचे कामही सुरू असून, डायरिया व कॉलरासदृश लक्षणांकडे तातडीने लक्ष देण्यात येत आहे.

ग्रामस्थांची मागणी

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे दूषित पाण्यामुळे कॉलराचा प्रादुर्भाव झाला, असा आरोप करत,

जलस्रोतांची तातडीने स्वच्छता करण्याची व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

“आरोग्य विभागाने वेळेवर लक्ष दिलं असतं, तर माझ्या पतीचा जीव वाचला असता,”

– बद्रे कुटुंबीयांची प्रतिक्रिया.

या प्रकरणानंतर आरोग्य विभागाकडून सतर्कतेचे निर्देश देण्यात आले असून,

पुढील काही दिवस गावात विशेष देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/ridhora-nag-prajaticha-venivar-sap-gharat-aadhala/

Related News