धक्कादायक! हडपसरमध्ये 22 वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी छळ;

धक्कादायक! हडपसरमध्ये 22 वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी छळ;

पुणे (प्रतिनिधी): लग्नात अपेक्षित हुंडा व मानपान न मिळाल्याने विवाहितेचा सासरच्या

मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. या छळाला कंटाळून हडपसर

येथील 22 वर्षीय दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Related News

ही घटना 19 मे रोजी घडली असून, याप्रकरणी पती प्रसाद चंद्रकांत पुजारी,

सासू सुरेखा पुजारी, सासरे चंद्रकांत पुजारी आणि दीर प्रसन्ना पुजारी यांच्याविरुद्ध हडपसर

पोलीस ठाण्यात हुंडा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपा आणि प्रसाद यांचा विवाह 18 एप्रिल 2024 रोजी

विजयपूरमधील बागेवाडी येथे पार पडला होता. दीपाच्या वडिलांनी विवाहात हुंडा म्हणून चार

तोळे सोने व सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र, लग्नानंतर लगेचच सासरच्या मंडळींकडून भांडी,

फ्रीज, इतर वस्तू न दिल्याच्या कारणावरून दीपाचा छळ सुरू झाला.

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या दीपाने अनेक वेळा माहेरच्यांना त्रासाबाबत सांगितले होते.

अखेर 18 मे रोजी तिने वडिलांना रडवेल्या सुरात फोन करून आपल्यावर होणाऱ्या

शारीरिक व मानसिक छळाची माहिती दिली होती. वडिलांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला,

मात्र दुसऱ्याच दिवशी 19 मे रोजी दीपाने हडपसरमधील राहत्या घरात आत्महत्या केली.

या प्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करत असून, समाजात

अजूनही हुंडा प्रथा व छळाचे भयाण वास्तव अधोरेखित करणारी ही घटना असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/aklychaya-police-superintendent-dawn-changed/

Related News