ढगफुटीसदृश पावसाने लोणार तालुक्यात हाहाकार; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

वरूण राजा कोपावला , लोणार शहरा सह तालुक्याला चारी बाजूने पावसाने झोडपले महिन्यात दुसऱ्यांदा ढगफुटी *पूर्वी झालेल्या ढग फुटी पेक्षा जास्त मोठे नुकसान रात्री मध्ये 288 ते 300 मी मी पाऊस लोणार शहरा सह संपुर्ण तालुक्यात काल मध्यरात्री नंतर पावसाने आपले रुद्र रूप दाखवत पूर्ण तालुक्यात सकाळ पर्यंत 288 ते 300 मी मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे, सगळी कडे पाणी च पाणी केले आहे त्या मुळे तालुक्यात सर्वच गावांत पिकांचे नुकसान झाले आहे आजून पर्यंत कोठेही जीवित हानी झाली नसल्याचा अंदाज आहे दिनाक 21 च्या दुपारी 3 वाजता अचानक लोणार शहरात पावसाला सुरुवात झाली ती जवळ जवळ अर्ध तास आती जोरात सुरू होता परंतु त्या नंतर पावसाने विश्रांती घेतली परंतु रात्री अचानक 1 वाजता च्या सुमारास पावसाला परत सुरवात झाली व अंदाजे 2 ते 3 वाजे च्या दरम्यान पावसाने परत रुद्र रूप घेतले व पूर्ण शहरा सह संपुर्ण तालुक्यात पाऊस सुरू झाला व त्यामुळे तालुक्यातील जवळ जवळ सर्वच लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत व बुहतेक नद्यांना पूर आले आहेत , ह्या पावसा मुळे शेतकऱ्यांचे फार मोठा प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे त्यामध्ये ,हिरडव, आरडव, वढव,जाफराबाद, दाभा, गुंधा, वेणी, मोहतखेड, वडगाव तेजन, खरामपूर, आजीसपूर, पांग्रा, टिटवी, नांद्रा, दे,कुंडपाल,अंभोरा,भूमराला, वझर आघाव, येवती,पारडा,कासारी, बिबखेड,आदी गावातील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ,या पावसामुळे नदी नाले एक झाले असून, शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली असल्याचा अंदाज आहे. अनेक गावातील अनेक शेतकऱ्याचे मोटार पंप , तुषार संचाचे पाईप ठिबक. शेतीपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्याच्या शेतातील सौलर संच प्लेट सुधा उखडून पडल्या आहेत, जुलै महिन्याच्या प्रारंभीच लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली होती. शेतकऱ्यांच्या पेरण्या उखडून परत केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबली नसतांनाच आज पुन्हा मोठे संकट कोसळले आहे. पहाटे ३ वाजेपासून ढग फुटल्यासारखा पाऊस कोसळत आहे , या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यावर निसर्ग कोपला अशी म्हणण्याची वेळ आली आहे.कसारी जवळ पूर्ण रोड खचून गेला आहे ,वरूण राजा कोपावला , लोणार शहरा सह तालुक्याला चारी बाजूने पावसाने झोडपले महिन्यात दुसऱ्यांदा ढगफुटी *पूर्वी झालेल्या ढग फुटी पेक्षा जास्त मोठे नुकसान रात्री मध्ये 288 ते 300 मी मी पाऊस लोणार शहरा सह संपुर्ण तालुक्यात काल मध्यरात्री नंतर पावसाने आपले रुद्र रूप दाखवत पूर्ण तालुक्यात सकाळ पर्यंत 288 ते 300 मी मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे, सगळी कडे पाणी च पाणी केले आहे त्या मुळे तालुक्यात सर्वच गावांत पिकांचे नुकसान झाले आहे आजून पर्यंत कोठेही जीवित हानी झाली नसल्याचा अंदाज आहे दिनाक 21 च्या दुपारी 3 वाजता अचानक लोणार शहरात पावसाला सुरुवात झाली ती जवळ जवळ अर्ध तास आती जोरात सुरू होता परंतु त्या नंतर पावसाने विश्रांती घेतली परंतु रात्री अचानक 1 वाजता च्या सुमारास पावसाला परत सुरवात झाली व अंदाजे 2 ते 3 वाजे च्या दरम्यान पावसाने परत रुद्र रूप घेतले व पूर्ण शहरा सह संपुर्ण तालुक्यात पाऊस सुरू झाला व त्यामुळे तालुक्यातील जवळ जवळ सर्वच लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत व बुहतेक नद्यांना पूर आले आहेत , ह्या पावसा मुळे शेतकऱ्यांचे फार मोठा प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे त्यामध्ये ,हिरडव, आरडव, वढव,जाफराबाद, दाभा, गुंधा, वेणी, मोहतखेड, वडगाव तेजन, खरामपूर, आजीसपूर, पांग्रा, टिटवी, नांद्रा, दे,कुंडपाल,अंभोरा,भूमराला, वझर आघाव, येवती,पारडा,कासारी, बिबखेड,आदी गावातील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ,या पावसामुळे नदी नाले एक झाले असून, शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली असल्याचा अंदाज आहे. अनेक गावातील अनेक शेतकऱ्याचे मोटार पंप , तुषार संचाचे पाईप ठिबक. शेतीपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्याच्या शेतातील सौलर संच प्लेट सुधा उखडून पडल्या आहेत, जुलै महिन्याच्या प्रारंभीच लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली होती. शेतकऱ्यांच्या पेरण्या उखडून परत केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबली नसतांनाच आज पुन्हा मोठे संकट कोसळले आहे. पहाटे ३ वाजेपासून ढग फुटल्यासारखा पाऊस कोसळत आहे , या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यावर निसर्ग कोपला अशी म्हणण्याची वेळ आली आहे.कसारी जवळ पूर्ण रोड खचून गेला आहे ,महागडे बी बियाणे खरेदी करून खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी केली पिके जोमात असतानाच मात्र पावसाच्या ढगफुटी सदृश्य संकटामुळे हिरव्या स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे. खरीप पिक कर्ज कसे परत करावे व कसा उदरनिर्वाह करावा हा प्रश्न उपस्थित झाला आहे संजय उत्तमराव सरकटे शेतकरी देऊळगाव कुंडपाळ *ढगफुटी सदृश पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शासनाने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत करावी सूर्यभान मारकड. शेतकरी दाभा नदी रुंदीकरणाची आली आठवण- नमामि गंगे अभियानांतर्गत नदी रुंदीकरण खोलीकरणाचे फक्त उद्घाटन झाले फोटो सेशन झाले मात्र प्रत्यक्षात काम झाले नाही जर नदी रुंदीकरण खोलीकरणाची काम झाले असते तर नदी पात्रातील पाणी शेत जमिनीवर पसरून पिकाची हानी टाळता आली असती असा सूरही आता दबक्या आवाजात ग्रामस्थांमधून ऐकु येत आहे. नुकसान झालेल्या सर्व गावातील शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,तसेच महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदू मापारी यांनी केली आहे दोघांना वाचवले विकास विठ्ठल वाघमारे वय 30, विठ्ठल रामचंद्र वाघमारे वय 52 हे दोघे सरस्वती नदी च्या पलीकडे अडकले होते त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले सोबतच दोन म्हशी वाचवण्यात आल्या आहेत। ओव्हर प्लो देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्पाच्या भिंतीला पडले भगदाड पाण्याचा विसर्ग सुरू

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून आलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला

असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांतील ही दुसरी मोठी ढगफुटी असून यावेळी झालेलं नुकसान अधिक व्यापक आहे.

रात्री 288 ते 300 मिमी पावसाची नोंद

21 जुलैच्या मध्यरात्री 1 वाजल्यापासून तालुक्यात पावसाने रौद्र रूप धारण केलं. पहाटे 3 वाजेपर्यंत तब्बल 288 ते 300 मिमी पावसाची नोंद झाली.

या अतिवृष्टीमुळे लोणार शहरासह तालुक्यातील अनेक गावांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

तलाव, नद्या आणि नाल्यांनी किनाऱ्यावरून वाहायला सुरुवात केल्याने अनेक ठिकाणी शेती आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली, पिकांचे थैमान

हिरडव, आरडव, वढव, जाफराबाद, दाभा, गुंधा, वेणी, मोहतखेड, वडगाव तेजन, खरामपूर, आजीसपूर,

पांग्रा, टिटवी, नांद्रा, दे, कुंडपाल, अंभोरा, भूमराळा, वझर आघाव, येवती, पारडा, कासारी, बिबखेड आदी गावांतील शेतकऱ्यांचे शेत जलमय झाले.

अनेक ठिकाणी शेती खरडून गेली असून मोटारपंप, तुषार संच, ठिबक सिंचनाच्या पाइप्स, सौलर प्लेट्स वाहून गेल्या आहेत.

शेतकरी संजय सरकटे (देऊळगाव कुंडपाल) म्हणाले, “महागडं बियाणं घेऊन सोयाबीनची पेरणी केली होती.

पिकं बहरात होती, पण आता हिरव्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. कर्ज फेडायचं कसं? पोट भरायचं कसं? हे समजत नाहीये.”

ओव्हरफ्लोने सिंचन प्रकल्पाला भगदाड

देऊळगाव कुंडपाळ येथील सिंचन प्रकल्पाच्या भिंतीला ओव्हरफ्लोमुळे भगदाड पडले असून तिथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

या भागातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदी रुंदीकरणाचे फसवे आश्वासन आठवले

“नमामि गंगे अभियानांतर्गत नदी रुंदीकरण व खोलीकरणाचं केवळ उद्घाटन झालं, प्रत्यक्षात कोणतेच काम झाले नाही.

आज जर ती कामं झाली असती, तर नदीचं पाणी शेतात घुसलं नसतं,” असं मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची गरज

शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदू मापारी यांनी म्हटलं आहे, “शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई द्यावी.

हे फक्त नैसर्गिक संकट नाही, तर दुर्लक्षाचा परिणाम आहे.”

प्रतिकूलतेतून सुटका – दोघांना वाचवण्यात यश

सरस्वती नदीच्या पलीकडे अडकलेले विकास विठ्ठल वाघमारे (वय 30) व विठ्ठल रामचंद्र

वाघमारे (वय 52) या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. याचवेळी दोन म्हशींनाही वाचवण्यात आलं.

निसर्गाने पुन्हा एकदा कोप दाखवत लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांची परीक्षा घेतली आहे.

आता शासनाने वेळ न घालवता तातडीने मदतीसाठी पुढे यायला हवे.

Read Also : https://ajinkyabharat.com/deougaon-kundapa-sinchen-problem-bhagadad/