305 लिटर गावठी दारू जप्त, 48 हजार रुपये मुद्देमाल नष्ट
अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी हद्दीत तिवसा गावात ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक छापे टाकले.
या कारवाईत 305 लिटर अवैध गावठी दारू जप्त केली गेली असून,
त्याची बाजारभावातील किंमत 48,250 रुपये इतकी आहे.
पंचांसमक्ष्य रेडदरम्यान आरोपी लक्ष्मण काशीराम घासले (वय 74)
यांच्या ताब्यातून 255 लिटर मोहमा व 5 लिटर दारू असा एकूण 38,250 रुपये
मूल्याचा मुद्देमाल जप्त झाला. तर आरोपी धनसिंग अमरसिंग राठोड (वय 73) यांच्या
ताब्यातून 45 लिटर दारू जप्त करण्यात आली, ज्याची किंमत 9,000 रुपये आहे.
दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन बार्शीटाकळी येथे कलम 65 ई, दारू बंदी कायद्यान्वये गुन्हे
दाखल करण्यात आले आहेत.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,
अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे आणि पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्य
मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
स्थानिक प्रशासनाने सांगितले की, ही कारवाई अवैध धंद्यांवर कडक लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने महत्त्वाची पाऊल आहे,
आणि भविष्यात असे धक्कादायक पथक ऑपरेशन नियमितपणे सुरू राहणार आहे.
read also:https://ajinkyabharat.com/children/