उंबर्डा बाजार –उंबर्डा बाजार व परिसरात भक्तिप्रवण वातावरणात गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला.
‘गणपती चालले गावाला, चैन पडेन आम्हाला’ अशी घोषणाही करत आश्रू नयनांनी गणरायाला निरोप देण्यात आला. वाजत-गाजत मिरवणूक निघाली. भक्तांनी गुलाल उधळून आनंद साजरा करत विसर्जन मिरवणुकीला रंग चढवला.
ग्रामीण भागात ११ दिवसांच्या पाहुणचारानंतर गणेश विसर्जनाचा विधीवत कार्यक्रम पार पडला. घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींचे विसर्जन शांततेने व भक्तिभावपूर्ण पद्धतीने करण्यात आले.
गणरायाच्या विसर्जनात महिला आणि मुलेही फुगड्या व ढोलताश्यांच्या गजरात भक्तिमय उत्साहाने सहभागी झाले.
विसर्जनाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येवता बंदी मार्गावरील धरणात विधीपूर्वक पूजन करून गणरायाचा विसर्जन करण्यात आले. तसेच विविध घरगुती गणपती मंडळांनी सोयीप्रमाणे आपल्या घराघरातील गणरायाचे विसर्जन केले.
यावेळी उंबर्डा बाजार गणेश मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सुमधुर प्रसादाने उपस्थित भक्तांचे मन समाधानले.
सदर कार्यक्रमात ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रविण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव आणि उंबर्डा बाजार चौकीकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे विसर्जन सोहळा सुरळीतपणे पार पडला.
विशेष भावना
गणरायाला निरोप देताना सर्वजण भावूक झाले. “पुढच्या वर्षी लवकर या, बाप्पा!” अशा भावपूर्ण उद्गारांनी वातावरण भरून गेले. भक्तांनी उत्साहाने गणरायाच्या परतीची अपेक्षा व्यक्त केली.
read also :https://ajinkyabharat.com/navnath-vaghmare-laxman-hake-yancha-aggressive-speech/