पराभवाची जबाबदारी स्वीकारात देवेंद्र फडणवीस यांचा धक्कादायक निर्णय भाजपा नेतृत्त्वाकडे केली विनंती
लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची आज बैठक पार पडली.
या बैठकीत पराभवासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर भाजप नेते
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधून भाजपचा पराभवाची कारणे माध्यमांना सांगितली.
त्यावेळी, लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य
मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे."नेता म्हणून
महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. मी हरणारा नाही,
पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे,
मला मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी.
मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे."
असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, ते मुंबईमध्ये बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही.
महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत बहुमत मिळवले तर एनडीएला 19 जागांवरच समाधान मानावे लागले.
2019 च्या निवडणुकीत 22 जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला फक्त 9 जागांवर विजय मिळवता आला.
फडणवीस यांनी राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही, याची कबुली दिली.