उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.

उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.

अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील चिखलगाव ते चिंचोली रुद्रायणी आणि पाटखेड गोटखेड अशा पाच ते सहा

गावाला जोडणारा मुख्य रस्ता कोटी रुपयाचा रस्ता मंजूर झालेला आहे.

दरम्यान रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने गावकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

Related News

यापूर्वी या रस्त्याबाबत विधानसभा निवडणुकीवेळी मुर्तीजापुर विधानसभेचे आमदार हरीश पिंपळे यांनी निधी मंजूर केला.

मात्र नंतर सदर रस्त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. या रस्त्यावर पवित्र श्रद्धा देवस्थान रूद्राई माता मंदिर असून रुद्राईमाता

मंदिराचे दर्शनासाठी राज्यभरातून भावीक भक्त येतात.

या मार्गावर चार ते पाच गावातील नागरिक दररोज येणे जाणे करतात.

मात्र रस्ता खराब असल्याने आता बससेवा ही खंडित झाल्याने या गावातील विद्यार्थ्यांना, रुग्णांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.

हा रस्ता दुरुस्ती करावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई मंत्रालयपर्यंत नागरिकांनी तक्रारी केल्या पण तरीही रस्ता नादुरुस्तच.

या दरम्यान,आमदाराच्या दुर्लक्षणामुळेच हा रस्ता रखडला असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला.

आता गावकरी जनआंदोलन उभारणार असे बोलताना व्यक्त केल.

Read Also : https://ajinkyabharat.com/mahisagar-riverwari-pool-kosala-three-deaths/

 

Related News