उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

अकोट

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस

पार्टीचे जिल्ह्यातील नेते तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल काळणे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील

Related News

शेकडो युवकांचा पक्षप्रवेश आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,

खा प्रफुल्ल पटेल, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आ. अमोल मिटकरी, संजय खोडके, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,

ग्रामीण जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रुजमा, यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील युवकांची अजितदादाना पसंती असून मोठ्या संखेत विविध पदाधिकारी असलेले युवक प्रवेश करतील राष्ट्रवादी

युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल काळणे यांच्या नेतृत्वात विविध गावातील युवा सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते,

हे पक्ष प्रवेश करणार असून या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक मजबूत होईल असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया

येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती,

नगर परिषद,निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरेल.

अमोल काळणे

जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अकोला.

Read Also :https://ajinkyabharat.com/mahavitranne-keli-mansunam-kamana-suruwat/

Related News