देवरी प्रतिनिधी :अकोट तालुक्यातील नावाजलेला देवरी फाटा हा व्यापारी आणि
शेतकरी वर्गाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठिकाण आहे.
अनेक दशकांपासून येथील शेकडो शेतकरी गाई-म्हशींच्या दुधाच्या व्यवसायावर अवलंबून आहेत.
मात्र सोयाबीन पिकाचा उच्चांक, हायब्रीड ज्वारीचे नुकसान आणि
तणनाशकांच्या परिणामामुळे गवताचे उत्पादन घटल्याने दुधाळ जनावरांना घरघर लागली.
यामुळे गुणवत्तापूर्ण दुधालाही योग्य दर मिळेनासा झाला होता.
या पार्श्वभूमीवर पाटसुल रेल्वे येथील सधनकास्तकार गोपाल मधुकरराव चौधरी यांनी
शेतकऱ्यांना चांगला भाव देत व ग्राहकांना शंभर टक्के ताजे आणि भेसळमुक्त दूध मिळावे
या उद्देशाने देवरी फाटा येथे ‘वारकरी दूध संकलन केंद्र’ सुरू केले आहे.
या डेअरीद्वारे दररोज सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ७
या वेळेत नागरिकांना दूध, दही, पनीर, खवा, श्रीखंड यांसारखे दर्जेदार पदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत.
यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळत असून
नागरिकांनाही शुद्ध आणि आरोग्यदायी दुग्धजन्य पदार्थांचा लाभ मिळू लागला आहे.
गोपाल चौधरी यांनी सांगितले की, “वारकरी दूध डेअरीच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य जपणे,
भेसळमुक्त दुग्धजन्य पदार्थ पुरवणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक आधार मजबूत करणे हा आमचा उद्देश आहे.”
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत वारकरी दूध डेअरीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/chaysgaav-hadlalam-bjp-pachya-maji-corporator-frankly/