अकोट तालुक्यातील देवरी गावात 20 सप्टेंबर रोजी आयोजित लोक अदालतीत गावकऱ्यांनी न्याय, संवाद आणि ऐक्याचा आदर्श साकारला. तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने वाद मिटवून, प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सलोख्याचा दीप प्रज्वलित झाला.
अकोटचे नायब तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी नरेंद्र सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या अदालतीत ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील व संबंधित शेतकऱ्यांचा सहभाग होता. न्यायालयीन प्रक्रियेच्या गुंतागुंतीशिवाय संवादातून समाधान मिळवण्यावर भर दिला गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायप्रिय प्रशासनाची झलक असलेल्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये ऐक्याचा भाव निर्माण झाला, तर वाद मिटवताना उमटलेला समाधानाचा भाव प्रशासनाच्या प्रयत्नांना सर्वोत्तम पुरस्कार ठरला.
read also :https://ajinkyabharat.com/balapur-police-stationwar-prohibition/
