देवरी गावात दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई

33 पावट्या जप्त, पुढे काय?”

देवरी : देवरी गावात अनेक दिवसांपासून खुलेआम चालत असलेल्या दारू विक्रीवर राज्य दारू उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. सुजाण नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारीनंतर मा. अधीक्षक सीमाताई झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यवाहीस सुरुवात झाली.सदर गावात पाचशेहून अधिक बाहेरगावातील मजूर रोज कामासाठी येतात, त्यामुळे दारू विक्रेत्यांची विक्री सातत्याने सुरु होती. नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी असूनही यापूर्वी कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. गावात दारू खुलेआम विक्री होत असल्याने घर संसारांवर परिणाम झाला आहे.(दि. 12 ) सप्टेंबर रोजी दारूबंदी पथकाने साडेबारा वाजता गावात प्रवेश केला. काही विक्रेत्यांनी सूचना मिळताच पळ काढला, परंतु दुसऱ्या दारू विक्रेत्याकडून 33 नग दारूच्या पावट्या जप्त करण्यात आल्या.या कारवाईसाठी मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली वैशाली विनायक धुरंदर, दुय्यम निरीक्षक एस.एम. सोनवणे, एस.एच. पटोकार, अ. गो. इंगळे, गीता भास्कर यांसह कर्मचारी प्रामुख्याने हजर होते.गावकऱ्यांमध्ये आता चर्चा आहे की, या कारवाईनंतरही दारू विक्रेत्यांवर प्रत्यक्ष ठोस परिणाम होणार की नाही, कारण यापूर्वी अनेक तक्रारी असूनही प्रशासनाचा परिणाम दिसला नाही.

read also : https://ajinkyabharat.com/bengali-babyachya-katyavanwar-action-suruvat/