दिल्ली सीएम आतिशींनी घेतलेला पहिलाच निर्णय चर्चेत!

दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अतिशी यांनी आज पदभार स्वीकारला.

त्या दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचल्या आणि

औपचारिकता पूर्ण केली. यादरम्यान आतिशी यांनी माजी

Related News

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सीएम ऑफिसमध्ये

रिकामी खुर्ची सोडली आणि स्वतः त्या दुसऱ्या खुर्चीवर बसल्या.

या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

आतिषी म्हणाल्या की, ‘राम वनवासात गेल्यावर ज्याप्रमाणे भरतने

अयोध्येचे सिंहासन घेतले, त्याचप्रमाणे मी दिल्लीच्या

मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेईन. 4 महिन्यांनंतर दिल्लीची जनता

केजरीवाल यांना पुन्हा त्याच खुर्चीवर बसवणार आहे. तोपर्यंत ही

खुर्ची याच खोलीत राहून केजरीवालजींची वाट पाहिल. आतिशी

यांच्या वक्तव्यावर दिल्ली भाजपचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा

म्हणाले की, ‘या कृतीमुळे आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री

पदाच्या प्रतिष्ठेसोबतच दिल्लीतील लोकांच्या भावना दुखावल्या

आहेत. हा आदर्श नाही. साध्या भाषेत ती खुशामत आहे.

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात 13 सप्टेंबर रोजी जामिनावर बाहेर

आल्यानंतर केजरीवाल यांनी 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा

राजीनामा दिला होता. 21 सप्टेंबर रोजी आतिशी दिल्लीच्या नव्या

मुख्यमंत्री झाल्या. 23 सप्टेंबर रोजी त्यांनी 5 मंत्र्यांसह शपथ

घेतली.

Read also: https://ajinkyabharat.com/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%87/

Related News