दिल्ली: आप नेत्या आणि मंत्री आतिशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ!

राजधानी

राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे.

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. आज

Related News

अरविंद केजरीवाल हे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा उपराज्यापलांकडे

सोपवणार आहेत. यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान

होणार, याबद्दल चर्चा रंगली आहे. अखेर आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्‍याचे

नाव समोर आले आहे. तब्बल दहा वर्षांनी दिल्लीला महिला मुख्यमंत्री

मिळणार आहे. आप नेत्या आणि मंत्री आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्यावर

शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार

याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होते. अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर बसवणार आहेत, असा आरोपही भाजप नेत्यांकडून केला

जात होता. मात्र, अरविंद केजरीवाल यांना मनाचा मोठेपणा दाखवत, आपल्या पक्षातील

महिला नेत्या आणि मंत्रिमंडळातील सहकारी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्लीच्या

सभागृहात ठेवला आहे. मंत्री आतिशी ह्याच दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार असल्याचे

आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे, शीला दीक्षित यांच्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीला

महिला मुख्यमंत्री मिळणार आहेत. अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री

करतील, असा दावा भाजप प्रवक्त्यांनी केला होता, पण त्यांचा हा दावा फोल ठरला.

Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jaranges-midnight-snack-starts/

Related News