पराभूत संघालाही मिळणार कोटींचं इनाम

इतिहासातील पहिला भारत-पाक अंतिम सामना!

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ची अंतिम लढत आज, रविवार, 28 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. क्रिकेटप्रेमींच्या उत्सुकतेचा शिगेला पोहोचलेला हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार असून, ही दोन्ही संघांची स्पर्धेतील तिसरी भिडंत ठरणार आहे.

विजेत्याला तब्बल 2.6 कोटी रुपयांचे बक्षीस
या वर्षीच्या आशिया कपच्या बक्षीस रकमेतील मोठी वाढ करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विजेत्या संघाला 2.6 कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला 1.3 कोटी रुपये इतकी बक्षीस रक्कम मिळणार आहे. याशिवाय, प्लेअर ऑफ द सीरीज खेळाडूला 12.5 लाख रुपये पुरस्कार दिला जाणार आहे. मागील आशिया कप 2023 मध्ये विजेत्या टीम इंडियाला 1.25 कोटींचं बक्षीस मिळालं होतं. यंदा ती रक्कम जवळपास दुप्पट करण्यात आली आहे.

बक्षीस रकमेचे तपशील:

विजेता संघ : ₹2.6 कोटी

Related News

उपविजेता संघ : ₹1.3 कोटी

प्लेअर ऑफ द सीरीज : ₹12.5 लाख

स्पर्धेतील कामगिरी:भारताने सुपर-4 मध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेवर विजय मिळवत गुणतालिकेत 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्तान दोन सामने जिंकून दुसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, 1984 पासून सुरू झालेल्या आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान प्रथमच अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध लढत आहेत. त्यामुळे आजचा सामना ऐतिहासिक ठरणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेलं वातावरण: पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात आशिया कपवर बहिष्कार टाकण्याची मागणी झाली होती. अनेकांनी बीसीसीआयच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. तरीदेखील अंतिम सामन्याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. प्लेअर ऑफ द सीरीजच्या स्पर्धेत सध्या अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव आघाडीवर आहेत. आजचा भारत-पाक सामना केवळ क्रिकेटचा नाही तर गौरव, सन्मान आणि इतिहास घडवण्याची संधी आहे. दोन्ही संघ विजेतेपदासाठी झुंज देणार असून, चाहत्यांमध्येही उत्सुकतेचे वातावरण आहे.

read also:https://ajinkyabharat.com/capten-suryacha-finally-clear-negative/

Related News