शासनाच्या धोरणनुसार प्रत्त्येक गाव टीबी मुक्त होऊन समृध्दआरोग्य दायी देश बनवा या अनुषंगाने
शासनाचे आदेशानुसार प्रत्त्येक गावात राबविण्यात येणाऱ्या टीबी मुक्त पंचायत अभियान कार्यक्रम
आरोग्य केंद्रा अंतर्गत राबविला जात असून आलेगाव येथील श्री संत मीराबाई संस्थान येथे टीबी मुक्त पंचायत
अभियान कार्यक्रमा मध्ये तालुका आरोग्य समन्वयक नितीन थुटे यांनी टीबी आजाराचा प्रसार हवेतून कसा होतो.
तसेच सदर आजाराची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपचार कुठे आणि कसा करावा या बाबत मार्गदर्शन
करून रुग्णांना सरकार कडून मिळणारे आर्थिक सहाय्य आणि नीक्षय मित्र यांचे कडून मिळणारे पोषण
आहारा बाबत मार्गदर्शन करून आशा कर्मचारी घरोघरी आरोग्य बाबत फिरून माहिती घेतील त्यानुसार
गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.तसेच संतोष चक्रनारायण यांनी गाव क्षय मुक्ती करीता आशा कर्मचारी
गावामध्ये टीबी संबंधित कार्य करीत असताना त्यांना योग्य वागणूक देऊन सहकार्याची भूमिका गावकऱ्यांनी
ठेवली तर गाव टीबी मुक्त करण्यासाठी मोलाचे ठरेल.सर्वांच्या सहकार्याने आपल्याला गाव क्षय मुक्ती करीता संकल्प
घेण्याची आवश्यकता असून उपस्थित मंडळींनी टीबी मुक्त गावांसाठी संकल्प घेतला.
टीबी पंचायत अभियान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत सरपंच गोपाल गणपतराव महल्ले होते तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार श्रीधर लाड होते.
या वेळी तालुका आरोग्य समन्वयक नितीन थूटे,संतोष चक्रनारायण,प्रा आ केंद्र कर्मचारी
एम पी.डबल्यू आशा कर्मचारी ग्राम पंचायत कर्मचारी गजेंद्र तेलगोटे,नागेश मोहाडे,
भीमराव तेलगोटे व गावातील महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read Also : https://ajinkyabharat.com/ghar-samoril-encroachment/