मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!

मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!

गावात मृत्यू म्हणजे केवळ शोक नाही,

तर एक त्रासदायक प्रवासाची सुरुवात होते.

नाल्याच्या दुर्गंधी पाण्यातून वाहत,

Related News

मृतदेहाला शेवटचा मुक्काम मिळतो.हिरपूर गावातील तरुण सुमित गावंडे यांचे अकस्मित निधन झाले आहे.

त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शोकाकुल नातेवाईक व गावकरी मंडळींना नाल्याच्या पाण्यातून जावे लागले,

ही अत्यंत दुर्दैवी व मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गावात पायाभूत सुविधांचा अभाव

असल्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळीही लोकांना पाण्यातूनच जावे लागले

जास्त पाणी असल्यास तर परिस्थिती आणखी बिकट,

पाण्याचा प्रवाह वाढतो, वाटेचा पत्ता हरवतो,

शेवटी मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना जीव मुठीत धरून

कमरेच्या वर असलेल्या पाण्यातून अंत्यसंस्कारासाठी जावे लागते.

गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ स्मशानभूमीपर्यंत

रस्ता व पुलासाठी मागणी करत आहेत,

पण यंत्रणा नेहमीप्रमाणे “होईल… पाहू…”

इतकंच उत्तर देत आली आहे.

आज गरज आहे ती केवळ पूल किंवा रस्ता नव्हे,

तर माणुसकीच्या दृष्टीकोनाची…

मृत्यू हा शेवट असतो, पण त्या शेवटाचा सन्मान असायला हवा.

गावकऱ्यांनी आवाज

“मरण यातना संपवा, स्मशानभूमीपर्यंत सन्मानाचा रस्ता द्या!”

Read Also :  https://ajinkyabharat.com/kanwad-yatremula-delhi-dehradun-national-mahamarg-wahtukisathi-closed-11-zulipasoon-regulation/

Related News