28 जण जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
उत्तर प्रदेश ची राजधानी लखनऊ मध्ये शनिवारी संध्याकाळी एक
मोठी दुर्घटना घडली. ट्रान्सपोर्ट नगर मध्ये तीन मजली इमारत
Related News
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :
लज्जास्पद! छत्तीसगडमध्ये सख्ख्या भावाकडून दोन वर्ष बहिणीवर बलात्कार;
समस्तीपूरमध्ये सात लाखांची लूट, दोन भावांवर गोळीबार;
IPL 2025 : प्लेऑफसाठी ‘करो या मरो’ सामना, मुंबई विरुद्ध दिल्ली…
ई-पासपोर्टची सुरुवात भारतात : प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार,
मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती
संभळ जामा मशिदीच्या सर्वे प्रकरणात मुस्लिम पक्षाला झटका;
भारतभरात पाकिस्तानसाठी काम करणारे गुप्तहेर उघड!
‘जासूस’ ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवा खुलासा!
‘ऑपरेशन सिंदूर’ प्रतिनिधिमंडळापासून ममता यांची तुटवड;
Jammu-Kashmir: शोपियांमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक:
उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर;
कोसळल्याने अनेकजण जखमी झाले. या अपघातातील मृतांची
संख्या 8 झाली असून 28 जण जखमी झाले आहेत.
सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
हरमिलाप इमारतीत तीन मजले होते. खाली मोबाईल आणि स्पेअर
पार्ट्सचे काम सुरू होते. मधल्या मजल्यावर औषधांचे गोदाम आणि
तिसऱ्या मजल्यावर भेटवस्तूंचे गोदाम होते. सर्वाना खालच्या
मजल्यावरून बाहेर काढण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
दोन मजल्यांच्या ढिगाऱ्याखाली नेमके किती लोक अडकले आहेत,
याची माहिती अद्याप मिळालेली नाही. ढिगाऱ्यातून लोकांना
शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बचाव अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची दखल घेतली
होती. तसेच एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांना
घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य लवकर सुरू
करण्यास सांगितले आहे. लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री
राजनाथ सिंह यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
त्यांनी सांगितले स्थानिक प्रशासन घटनास्थळी मदत आणि बचाव
कार्य करत असून पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bihar-43-ias-officers-and-dms-of-12-districts-changed/