ग्राम हिरपूर येथील दोन अल्पवयीन युवकांचा कमळगंगा नदीच्या पात्रात
बुडून मृत्यू झाल्याचे हृदय द्रावक घटना मौजा मोहब्बतपुर शिवारात
दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
Related News
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
प्राप्त माहितीनुसार हिरपूर येथील तीन अल्पवयीन युवक आपल्या
मोहब्बतपुर शिवारात असलेल्या शेतात फवारणीचे काम सुरू होते
या निमित्ताने जेवणाचा डब्बा घेऊन शेतात गेले होते.
मार्गात असलेल्या नदीच्या पात्रातील पाणी पाहून पोहण्याचा मोह आवरला नाही.
मो. अयान अ.अजीज (वय-१७), मो. अमीर अ. मुजमील अहेमद (वय-१५) यांनी
पोहण्यासाठी उड्या मारल्या त्यांच्या सोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला
आपले दोन्ही मित्र वर आले नसल्याचे दिसताच त्याने आरडा ओरड सुरू केली असता
टॉवरच्या कामास साठी जाणाऱ्या इसमाने नदीवर घडलेल्या प्रकाराची कल्पना
जितापूर खेडकर येथील युवकास दिली. सागर नाकट, भावेश नाकट, भूषण खेडकर,
लक्ष्मण घोडेस्वार यांनी घटनास्थळ गाठुन त्यांना नदीपात्रातून बाहेर काढले
तेव्हा धुकधुकी सुरू होती. तात्काळ उपचारासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा
रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी दोघांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळतात ग्रामीणचे ठाणेदार कैलास भगत ताफ्यासह रुग्णालयात दाखल झाले.
अब्दुल अजीज यांच्या शेतात पोल्ट्री फार्म असून त्यांना मो.आयान नावाचा
हा एकुलता एक मुलगा असून तो इयत्ता अकरावीत शिक्षण घेत असल्याचे कळले.
सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/vij-broke-during-hockey-match-in-jharkhand/