Delhi Capitals vs Lucknow Super Giants : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत
18 व्या मोसमात फ्लॉप ठरला. लखनौकडून खेळताना पंत फलंदाज, कर्णधार आणि विकेटकीपर या तिन्ही भूमिकांमध्ये अपयशी ठरला.
ऋषभ पंत याच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सुरुवात अपेक्षित झाली नाही.
Related News
ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा! मुलाला संपत्तीतून बेदखल करता येणार; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
भारतात वाढत्या वयासोबत ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्ष...
Continue reading
EPFO PF Rules : उपचार, शिक्षण, लग्नासाठी आता झटपट काढता येणार PF; EPFO ने बदलले नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती
EPFO PF Rules : कर्मचारी भविष्य ...
Continue reading
या 5 आरोग्यदायी बियांचा रोजच्या आहारात करा समावेश; शरीराला मिळेल भरपूर पोषण
Healthy Seeds Benefits : बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याची काळ...
Continue reading
RBI New Rule: लोन घेणाऱ्यांना मोठा दिलासा! नवीन नियमामुळे EMI आणि व्याजदरावर होणार मोठा परिणाम
RBI Rule About EMI : गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज ...
Continue reading
पुण्यात येऊ नये असं वाटतं, एवढं प्रदूषण आणि ट्रॅफिक; नितीन गडकरींच्या विधानावर मनसेचा हल्लाबोल
Pune News : पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाह...
Continue reading
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मोठी मागणी, युक्तिवादाने खळबळ
Shivsena Supreme Court Hearing...
Continue reading
Kartik Aaryan : शूटिंगदरम्यान कार्तिक आर्यन जखमी, रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?
बॉलिवूड अभिनेता Kartik Aaryanच्या चाहत्यांसाठी चिंतेची बातमी ...
Continue reading
‘ही’ लक्षणं जाणवत आहेत? घरीच करा थायरॉईडची ‘नेक टेस्ट’; पण ‘या’ गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम थेट आरोग्यावर होताना द...
Continue reading
पालकापासून बनवा 4 चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ; नाश्त्यापासून जेवणापर्यंत उपयोगी, जाणून घ्या सोप्या रेसिपी
पालक ही हिरवी पालेभाजी पोषक घटकांनी समृद्ध मानली ...
Continue reading
सावधान! ड्रायव्हिंग करताना नवीन गाणी शोधण्याची सवय बेतू शकते जीवावर; रिसर्चमध्ये मोठा खुलासा
वाहन चालवताना संगीत ऐकणे अनेकांसाठी प्रवासाचा आनंद वाढवणारा ...
Continue reading
Royal Enfield Classic 350 Gorkha Edition Launch : रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे ‘गोरखा एडिशन’ लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
भारतीय दुचाकी बाजारपेठेत रॉयल एनफील्डच्या बाईक्सची ल...
Continue reading
Pune News : बावधनमध्ये खड्ड्यांचा कहर; पाण्याने भरलेल्या रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक
‘पुणे तिथे काय उणे!’ असं मिश्कीलपणे म...
Continue reading
लखनौला सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सकडून रंगतदार सामन्यात 1 विकेटने पराभूत व्हावं लागलं.
या सामन्यात ऋषभ पंत अपयशी ठरला. पंत या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू आहे.
मात्र पंत कर्णधार आणि फलंदाज म्हणून आपल्या भूमिकेला न्याय देऊ शकला नाही.
पंतने बॅटिंगने निराशा केली. पंतला भोपळाही फोडता आला नाही.
तसेच पंतने विकेटकीपर म्हणूनही काही चुका केल्या, ज्या लखनौच्या पराभवास कारणीभूत ठरल्या, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही.
पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई
लखनौ पंतवर मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2025 Mega Auction) विक्रमी बोली लावली.
लखनौने पंतला 27 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र पंतला या मोहिमेतील पहिल्याच सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
मात्र त्यानंतरही पंतची जवळपास 2 कोटींची कमाई झाली. आयपीएल स्पर्धेत प्रत्येक संघ साखळी फेरीत 14 सामने खेळते.
त्यानुसार प्रत्येक सामन्यानुसार पाहिलं तर पंतला एका सामन्याचं जवळपास 2 कोटी मानधन आहे.
त्यानुसार पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई झाली, असं म्हटलं जातंय. पंत दिल्लीविरुद्ध 6 चेंडूंचा सामना केला आणि भोपळा न फोडताच माघारी परतला.
पंतमुळे लखनौचा पराभव?
पतंने बॅट्समॅन आणि कर्णधार म्हणून चुका केल्या. तसेच पंत विकेटकीपर म्हणूनही अपयशी ठरला.
पंतने दिल्लीच्या डावातील 15 व्या ओव्हरदरम्यान शाहबाज अहमदच्या बॉलवर आशुतोष शर्मा याचा कॅच सोडला.
याच आशुतोष शर्माने (इमपॅक्ट प्लेअर) सामना फिरवला आणि दिल्लीला विजयी केलं.
पंतने हा कॅच घेतला असता तर निश्चित सामन्याचा निकाला वेगळा लागला असता.
इतकंच नाही, पंतने दिल्लीच्या 20 व्या ओव्हरमध्ये स्टंपिंगची संधी सोडली.
पंतने मोहित शर्मा याला स्टंपिंग करण्याची संधी गमावली. पंतने मोहितला स्टंपिंग केलं
असतं तर लखनौचा विजय झाला असता, कारण त्यांनी आधीच 9 विकेट्स गमावल्या होत्या.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत
(कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकुर आणि रवी बिश्नोई.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : जेक फ्रेझर-मॅकगुर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर),
समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा आणि मुकेश कुमार.