छोट्या पडद्यावर सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. हिंदी टीव्ही
इंडस्ट्रीतही टीआरपीची स्पर्धा सुरू आहे. त्यानुसार, मालिका, रिएलिटी
शो बाबत निर्णय घेतले जात आहेत. सोनी वाहिनीदेखील आता काही
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
मालिकांबाबत मोठा निर्णय घेणार आहे. काही मालिका प्रेक्षकांचा निरोप
घेणार आहेत. तर, काही जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
छोट्या पडद्यावरील एसीपी प्रद्युमन, दया-अभिजीत पुन्हा एकदा दिसणार
आहेत. सीआयडी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खानचा ‘आपका अपना झाकीर’ हा शो महिनाभरापूर्वी
सुरू झाला होता. मात्र सोनी टीव्ही वाहिनीने तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
एवढेच नाही तर सुंबूल तौकीर खानच्या ‘काव्या’सह अनेक मालिका अडचणीत
येणार आहेत. लवकरच चॅनलवर अनेक मोठे बदल पाहायला मिळणार असल्याचे
सांगण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात स्टार इंडियाचे गौरव बॅनर्जी यांनी
सोनी नेटवर्कची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी सूत्रे हाती घेताच चॅनलमध्ये अनेक
मोठे बदल करण्याचे त्यांनी ठरवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या
अखेरीस बरेच बदल पाहायला मिळतील. सध्या क्रिएटिव्ह टीम नवीन कंटेंट तयार
करण्यात व्यस्त आहे. तसेच प्रेक्षकांना पुन्हा सोनीकडे वळवण्यासाठी काम सुरू
असल्याची माहिती आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/strong-earthquake-in-delhi-ncr/