दसऱ्याला सोनं आणि चांदीच्या भावात मोठी झेप

दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशात तडाखा!

मौल्यवान धातुंच्या दरवाढीमुळे दसऱ्याला ग्राहकांचे लक्ष सोन्या-कॉपी चांदीकडे लागले आहे. मागील काही दिवसांत सोनं आणि चांदी सातत्याने वाढत असून यंदा सोने लाखाच्या टप्प्याला धडकले आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव आता 11,230 रुपये प्रति ग्रॅम, तर 22 कॅरेट 10,295 रुपये इतका झाला आहे.

चांदीतही मोठी झेप दिसून येत आहे. 1 किलो चांदीचा भाव 1,28,000 रुपये इतका झाला असून मागील काही दिवसांत दरवाढ सातत्याने सुरु आहे. अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीत सकारात्मक संकेत दिसण्याची शक्यता असल्याने दोन्ही धातुंच्या किंमतींमध्ये रॅली येण्याची शक्यता आहे.

आज इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 1,09,780 रुपये, 23 कॅरेट 1,09,340 रुपये, 22 कॅरेट सोने 1,00,500 रुपये, 18 कॅरेट 82,330 रुपये आणि 14 कॅरेट सोने 64,220 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सराफा बाजारात कर व शुल्काच्या समावेशामुळे थोडी तफावत दिसत असली तरी जागतिक आणि देशांतर्गत बाजारात दरवाढ सातत्याने आहे.

ग्राहकांसाठी आता मोठा प्रश्न आहे – दसऱ्याला सोने कसे “लुटणार”? दरवाढीमुळे अनेकांनी गुंतवणूक किंवा खरेदीबाबत पुन्हा विचार सुरू केला आहे.

read also :https://ajinkyabharat.com/bachu-kadu-yanchi-shetkari-haqka-sabha/