दारूवरील करवाढीविरोधात अकोल्यात वाईन बार बंद; शासनाला बेमुदत बंदीचा इशारा

दारूवरील करवाढीविरोधात अकोल्यात वाईन बार बंद; शासनाला बेमुदत बंदीचा इशारा

अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशन तर्फे आज जिल्ह्यातील सर्व वाईन बार बंद ठेऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला

राज्यातील परमिटरुम बार वर राज्यशासनाने १०% वॅट टॅक्स वाढ आणि एक्साईज ड्यूटी वाढवल्याने दारुचे भाव सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

आणि यामुळे परमिटरुम बार उद्योग संपूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप बारमालकांनी केला आहे आहे.

Related News

आज संपूर्ण परमिटरुम बारच्या अग्रगण्य संघटना आहार आणि विदर्भ परमिटरुम बार संघटनेनी एकदिवसीय बंद पुकारला आहे.

हे एकदिवसीय बंद लाक्षणिक असून यानंतरही राज्य शासनाला जाग नाही आली तर राज्यातील संपूर्ण बार मालक बेमुदत बंद पुकारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

आज अकोला शहरातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला यामध्ये

मोठ्या संख्येने बारमालक आणि कामगार उपस्थित होते तर शासनाने वाढवलेले 10 टक्के वॅट हटवण्याची मागणी सुद्धा करण्यात आली.

Read Also : https://ajinkyabharat.com/assembly-speaker-hut-ahet-women-exploitation-episode-aamdar-nitin-deshmukh-yancha-thiaya-movement/

Related News