दरोड्याची तयारी: अमरावती येथे तिघांना अटक

दरोड्याची तयारी: अमरावती येथे तिघांना अटक

अमरावती शहरात दरोड्याची तयारी करत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीवर गुन्हे शाखेने  कारवाई करत तिघांना अटक केली असून,

दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत एकूण सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा  युनिट-२ चे पोलीस अधिकारी गस्त घालत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की

न्यू बायपास रोडवर वड्डरपुरा परिसरात काही संशयित व्यक्ती एकत्र जमून ये-जा करणाऱ्या वाहनांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्वरित सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला.

छाप्यादरम्यान पाच जणांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले, तर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी जबरदस्तीने चोरी केलेल्या दोन प्रकरणांचा उलगडा केला आहे.

Read Also :https://ajinkyabharat.com/mothi-action-under-uru-police-station-station/