दानापूर (वा)
वाण नदीच्या तीरावर वसलेल्या व तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे पंढरपूर च्या यात्रे नंतर येणाऱ्या आषाढी कृष्ण चतुर्थी ला
म्हणजेच सोमवारी राधाकृष्ण रासलीला लईत यात्रा महोत्सव दुर्गा माता मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली.
Related News
गावच वैभव असणाऱ्या वाण नदीच्या तीरावर भक्ती व श्रद्धेचा अनोखा संगम याची देही याची डोळा अनेकांनी अनुभवला.
यावेळी लहान बालकांना राधाकृष्णाचा वेश परिधान केला होता. राधाकृष्णाच्या वेशभूषेत कार्तिक दांदळे,रुद्र चिंचोलकर, समर्थ हागे, या तीन मुलांना सजवीण्यात आले होते.
हरिनामाचा गजरात राधाकृष्णाचा जयजयकार करीत सायंकाळी भाविकांनी वाण नदीच्या तीरावर दर्शनासाठी एकच गर्दी केलेली पहायला मिळाली.
पावसाळ्यात कितीही पाऊस थांबला तरी या दिवशी दरवर्षी पाऊस हजेरी लावतो असा येथिल वृद्ध व्यक्तीचा अनुभव आहे.
अतिवृष्टी असली तरी या दिवशी थांबते असे सांगितले जाते.
यावेळी शेतकऱ्यांनी भरपूर पाऊस पडू दे व बळीराजा सुखी होऊ दे असे राधकृष्णाला साकडे घातले हजारो
भाविकांचे पाऊले आपसूकच या यात्रा स्थळाकडे वडत होती भाविक भक्तिभावाने दर्शन घेत होते.
यावेळी सायंकाळी सहा वाजता वाण नदीच्या पात्रात राधाकृष्ण व रुख्मिणी यांना दही, पोहा, शिरा ,खिरापत व मिष्टानांचे
जेवण यावेळी देण्यात आले. लाह्या व दहीहंडीचा हजारो भाविकांनी यावेळी लाभ घेतला ,भगवंताला झुल्यात बसवून राधाकृष्ण अश्या जयघोषात हलवण्यात आले.
महाआरती नंतर सायंकाळी राधाकृष्ण, रुक्मिणी यांना खांद्यावर बसून ढोलाच्या च्या भक्तिमय वातावरणात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी ठीक ठिकाणी भाविकांनी रस्त्यावर रांगोळी ,दीपप्रज्वलन करून स्वागत केले.
व राधाकृष्णाची पंचारती ओवाळून पूजा यावेळी करण्यात आली.
येथील सरदार सिंग ठाकूर यांच्या निवासस्थानी महाआरती करून महाप्रसाद वितरित करण्यात आला.
लाई फुटाणे चा मानाचा प्रसाद
पंढरपूर च्या विठोबा च्या यात्रेला मुरमुरा लाई चा प्रसाद वारकऱ्यांना ,भक्तांना वाटप केला जातो. मात्र दानापूर येथिल लाईत
यात्रा ही पंढरपूर च्या यात्रे नंतर आठ दिवसांनी भरवली जाते या यात्रेत मानाचा प्रसाद म्हणून ज्वारी ची लाई गावातून मिरवणुकी दरम्यान प्रसाद म्हणून वाटली जाते.
यात्रेत पावसाची जोरदार हजेरी.
जुने जाणते सांगता कितीही दुष्काळ असला तरी या यात्रेत राधा कृष्ण यांची ज्यावेळी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते त्यावेळी पावसाची हजेरी वरून राजा लावतो .
आमच्या पुर्वजांनी 150 वर्षा पूर्वी सुरू केलेली लईत यात्रेची परंपरा गावकऱ्यांच्या सहकार्याने आजही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
ही पंढरपूर च्या यात्रे नंतर दानापूर येथे भरवली जाते ही यात्रा तेल्हारा तालुक्यातील एकमेव यात्रा म्हणून ओळखली जाते.
यात्रेत मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील भाविक सहभागी होतात.
Read Also : https://ajinkyabharat.com/jastagavajav-duchaki-bulglagila-bulgogila-strong/