जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालय अकोला दि. 25/05/2024
वाचा- फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 (1) (2) (3)
आदेश ज्याअर्थी प्रादेशिक मौसम विभाग नागपुर यांचा प्राप्त संदेश दि. 25/05/2024 नुसार दि.
25 ते 31 मे 2024 पर्यंत उष्मालाटेची शक्यता वर्तविली आहे.सदयस्थितीत अकोला जिल्हयामध्ये तापमान
44°C ते 46°C असे असुन तापमानाचा पारा चढता असल्यामुळे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे, त्यामुळे
उष्माघाताचा धोका निर्माण झाला असुन उष्माघातामुळे सर्वसामान्य नागरीकांना,
कामगारांना तसेच विदयार्थ्यांना त्रास होऊ नये या करीता कामगारांना आवश्यक सेवा पुरविणे, खाजगी क्लासेसच्या वेळेमध्ये बदल करणे
तसेच इतर उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे माझे मत आहे.त्याअर्थी,
मी अजित कुंभार भा.प्र.से. जिल्हादंडाधिकारी अकोला, मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून
अकोला जिल्हयात दि. 25/05/2024 रोजीचे दु.4.00 वा. पासुन ते दि. 31/05/2024 रोजीचे 24.00 वा. पर्यंत फौजदारी
प्रक्रीया संहीता, 1973 चे कलम 144 चे आदेश लागू करण्यात येत असून खालीलप्रमाणे आदेशित करण्यात येत आहे.
1.उक्त नमुद कालावधीमध्ये अंगमेहनत करणारे कामगार तसेच औदयागिक क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार
यांचेकडुन उन्हात काम करुन घेता येणार नाही 2.ज्या कामाच्या ठिकणी अत्यावश्यक काम असेल
अशा ठिकाणी उष्माघातापासूण संरक्षणासाठी पुरेसे शेड तयार करणे, पंखे
कुलर किंवा तत्सम साधनांची व्यवस्था करणे तसेच पिण्याचे पुरेसे पाणी व प्रथमोपचार पेटी
ठेवणे याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालक यांची राहील. याबाबत तक्रार असल्यास ती
संबंधित ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरीषद, पोलिस विभाग, कामगार कल्याण विभाग यांचेकडे
करता येईल.3 खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी स. 10.00 वाजेपर्यत व सायंकाळी 5 वाजेनंतर कोचिंग सेंटर चालवावेत तद्नंतर स. 10 ते 5 या वेळेत कोचिंग क्लासेस सुरु ठेवायचे असल्यास कोचिंग सेंटर
मध्ये पुरेसे पंखे, कुलर तत्सम साधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी खाजगी कोचिंग
क्लासेसच्या संचालकांची राहील.सदरचा आदेश हा सर्व संबंधितावर वैयक्तीकरीत्या नोटीस
बजावणी करणेसाठी पुरेसा कालावधी नसल्याने फौजदारी प्रक्रीया संहीता, 1973 चे कलम 144(2) नुसार
एकतर्फी काढण्यात येत आहे.
Read Also