‘दाना’ चक्रीवादळाचा धूमाकूळ!

सध्या ओडिशासह , पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये ‘दाना’

चक्रीवादळाने दाणादाण उडवली आहे. त्या पार्श्वभूमीवर

किनारपट्टीच्या भागांत सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली

Related News

असून अनके नागरिकांना स्थलांतरितही करण्यात आलं आहे.

ओदिशातही चक्रीवादळाचा कहर दिसत असून याचदरम्यान लाखो

लोकांचीही सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

याचदरम्यान ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी

महत्वाची पण एक गुड न्यूज दिली आहे. दाना चक्रीवादळामुळे

आरोग्य केंद्रात हलवण्यात आलेल्या 4,431 गर्भवती महिलांपैकी

1,600 महिलांनी मुलांना जन्म दिल्याचे त्यांनी नमूद केले.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण 5,84,888

लोकांना धोक्याच्या भागातून हलवण्यात आले आहे. ही संख्या

आणखी वाढू शकते. हलवण्यात आलेले हे नागरिक 6 हजारापेक्षा

अधिक चक्रीवादळ निवारागृहात राहत आहेत, जिथे त्यांना अन्न,

औषध, पाणी आणि इतर आवश्यक वस्तू दिल्या जात आहेत, असे

मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. बालासोर जिल्ह्यातून सर्वाधिक लोकांचे

स्थलांतर करण्यात आले, तेथे 1 लाख 72 हजार 916 लोकांना

सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तर मयूरभंज येथे 1 लाख

लोकांना हलवण्यात आले. याशिवाय भद्रकमधून 75 हजार,

जाजपूरमधून 58 हजार आणि केंद्रपारा येथून 46 हजार लोकांना

सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली

आहे. आम्ही हाय रिस्क असलेल्या भागातून सर्व लोकांना

यशस्वीरित्या बाहेर काढले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री मांझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित

शाह यांना राज्यातील तयारीबद्दल माहिती दिली. ओडिशा सरकारने

उचललेल्या पावलांवर केंद्राने समाधान दर्शवलं आहे. दरम्यान

आदल्या दिवशी, कटक जिल्ह्यातून सुरक्षित स्थळी हलवण्यात

आलेल्या एका महिलेने नियाली रुग्णालयात मुलाला जन्म दिला.

राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क (I&PR) विभागाने

याची घोषणा केली होती. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर

आश्रयस्थानात हलवण्यात आलेल्या 4,431 गर्भवती महिलांमध्ये

त्या महिलेचा समावेश होता.

Read also: https://ajinkyabharat.com/disabled-and-elderly-voters-can-vote-from-home/

Related News