तेल्हारा बस स्टँड जवळील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण
तेल्हारा (प्रतिनिधी): तेल्हारा बस स्टँडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः श्री. शिवाजी हायस्कूलच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असून, त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या बसेस, इतर वाहन आणि प्रवासी या सर्वांना गंभीर त्रास होत आहे.स्थानिक प्रवासी आणि वाहनचालकांचे म्हणणे आहे की, या परिस्थितीमुळे कोणताही अपघात होऊ शकतो आणि ते गंभीर परिणाम घडवून आणू शकतो. या अतिक्रमणामुळे वाहतुकीचे नियोजन बिघडले असून, वाहनांना रस्त्याच्या योग्य जागेवरून चालता येत नाही.तेल्हारा नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी योग्य व्यवस्था केली गेल्यास अपघाताची शक्यता लक्षणीय कमी होईल आणि प्रवाशांचे तसेच वाहनचालकांचे सुरक्षिततेचे भान राहील.
read ALSO : https://ajinkyabharat.com/swati-sharma-yanchaya-hastay-award/